श्रीगणेशाच्या मूर्ती छोट्या; पण खरेदीचा आलेख उंचावला

श्रीगणेशाच्या मूर्ती छोट्या; पण खरेदीचा आलेख उंचावला

बाप्पाच्या आगमनाने आर्थिक चैतन्य…

दर वर्षी मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून घरगुती गणपती बसविणार्‍या मुंबईकरांमध्ये बाप्पांच्या मूर्तींमध्ये आता चांगलीच वाढ झालेली आहे. यंदा घरगुती बाप्पांच्या संख्या ही १० लाख इतकी झालेली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यावर्षी कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी छोट्या मूर्तींची मागणी वाढली आहे. घराबाहेर पडण्यापेक्षा बाप्पाला घरात आणण्यासाठी भक्तांनी पसंती दिली आहे. त्यामुळेच याचाच परीणाम म्हणून रोजगारामध्येही चांगलीच वृद्धी झालेली दिसून येत आहे. यंदा लसीकरण तसेच प्रतिबंधात्मक उपायांमुळे नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण कमी आहे.

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, घरगुती मूर्तींची मागणी बाजारामध्ये चांगलीच वाढलेली आहे. घरगुती बाप्पांच्या संख्येत जवळपास तिपटीने वाढ झालेली आहे. एकूणच या उत्सवाची उलाढाल ही ३०० कोटींच्या घरात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशासह विश्वभरातील कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहे. तसेच अनेक उद्योगांवर कोरोनाचे सावट आले आहे. दरवर्षी घरगुती बाप्पांची उंची १ ते ३ फुटांची असते. मात्र यावर्षी मुंबईकर साधेपणात गणेशोत्सव साजरा करणार असल्यामुळे छोट्या मूर्तींची मागणी वाढली आहे. छोट्या बाप्पांच्या मूर्तीमध्ये ६ इंच, ८ इंच आणि ९ इंचाच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

यंदाची परिस्थिती लक्षात घेता अनेक नागरिक छोटी मूर्ती मिळावी म्हणून अगोदरच बाप्पांची मूर्ती घेऊन जात आहे. तसेच अनेक मूर्तीकारांकडे दर वर्षीप्रमाणे छोट्या मूर्तींची संख्या कमी असतात. आता कोरोनामुळे छोट्या मुर्तीची मागणी वाढल्याने छोट्या मूर्तींच्या किंमतीही महागल्या आहेत. साधारणत: ६ इंचाची मूर्ती किंमत १५० रुपये आहे. ती किंमत आता २५० रुपये इतकी झाली आहे. तसेच ८ इंचाची मूर्ती २५० रुपये आहे ती आता ३५० रुपयांवर पोहोचली असल्याचे बाजारात दिसून येत आहे. मूर्तीनुसार या क्षेत्रामध्ये जवळपास ६० कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. छोट्या मूर्तींची मागणी वाढल्याबरोबरच कारागीरांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळेच आर्थिक गणितेही चांगलीच वधारली आहेत. सजावटीचा बाजारही सजला असून, या बाजारामध्येही चांगलीच वर्दळ दिसून येत आहे.

Exit mobile version