श्रीनगर अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचा ३ दिवसात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सोबतच भाविकांची ने-आण करणाऱ्या घोडेस्वाराचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेत एकूण ४९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे ८ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पुरात एकूण १५ भाविकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून अमरनाथ यात्रेसाठी हजारो भाविक जात असतात. पुण्यातील धायरी येथे राहणाऱ्या २ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच महेश राजाराम भोसले, प्रमिला प्रकाश शिंदे हे दोघे बेपत्ता झाले आहेत. सुनिता महेश भोसले ह्यांचा मृत्यू झालेला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धायरी येथे भोसले कुटुंबाची भेट घेत त्यांच सांत्वन करत जिल्हा प्रशासनाशी भोसले कुटुंबाचा संपर्क देखील करून दिला आहे. अमरनाथ यात्रा आयोजक शुभम खांडेकर ह्यांनी दिलेल्या माहितीमध्ये पिंपरी-चिंचवड येथील नागरिक यात्रा पूर्ण करून घरी परतल्या नंतर हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
अश्विनी भिडे यांचे स्वागत करायला स्टाफ धावला!
राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार
पुलवामात भ्याड दहशदवादी हल्ला, एक जवान शहीद
प्रतीक्षा संपली!! नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग ‘या’ तारखेपासून सुसाट
३० जूनपासून सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये आता पर्यंत एकूण ४७ भाविक यात्रिकांचा मृत्यू झालेला आहे. यात्रेकरूंची ने-आण करणाऱ्या २ घोडेस्वारांचाही मृत्यू झालेला आहे. एका घोडेस्वाराचा पहलगाम येथे खोल दरीत पडून मृत्यूमुखी झाला. ८ जुलै रोजी झालेल्या पावसाच्या पुरात १५ यात्रेकरू मृत्युमुखी पडले. ५५ यात्रेकरू जखमी झाले आहेत. पवित्र “बाबा बर्फानी” ह्यांचे आता पर्यंत १ लाख ५०हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे.