यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार

सीता आणि तिची दोन जुळी मुले लव आणि कुश यांच्या मूर्ती

यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार

अयोध्येतील राम मंदिरातील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या तयारीला वेग आला असतानाच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सीतेच्या मंदिराचाही नुकताच जीर्णोद्धार झाला. या मंदिरात एकल मातृत्वाचा गौरव केला जातो. म्हणूनच या मंदिरात सीतेसोबत लव आणि कुश यांच्या मूर्ती आहेत. मात्र श्रीरामाची मूर्ती नाही.

 

यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे हे आगळेवेगळे मंदिर आहे. येथे केवळ सीता आणि तिची दोन जुळी मुले लव आणि कुश यांच्या मूर्ती आहेत. मात्र येथे राम आणि लक्ष्मणाच्या मूर्ती नाहीत. सीता आणि लव-कुश यांच्या मूर्ती काळाच्या ओघात वाईट अवस्थेत होत्या. आता त्या दगडात कोरण्यात आल्या आहेत. तसेच, मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराचे उद्घाटन ७ नोव्हेंबर रोजी झाले.

 

‘अवघ्या देशाचे डोळे अयोध्येकडे लागले असताना, येथे रावेरीमध्ये सीतेला समर्पित अशा मंदिराद्वारे आमच्या जीवनात नवे पर्व सुरू झाले आहे. आमची या मंदिराप्रति, सीतेप्रतिची भक्ती पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे. आमच्या मंदिराला नव्या मूर्ती मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत,’ असे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटाप यांनी सांगितले.

हे ही वाचा:

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द

हमासचा युनिट कमांडर ठार; हजारो नागरिकांनी उत्तर गाझा सोडले

पॅलेस्टिनी दहशतवाद्याचे कौतुक करणाऱ्या सुधन्वा देशपांडेंना IIT मध्ये आमंत्रण कशासाठी?

तडीपारी प्रकरणातून राज ठाकरे मुक्त

 

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना सन २००१मध्ये मंदिराचे वेगळेपण अधोरेखित करण्याचे श्रेय जाते. जंगलात राहताना एकल माता असणाऱ्या सीतेने ज्या प्रकारे रामाच्या वारसांना शिक्षण दिले, संस्कार दिले, त्याचे प्रतिबिंब या मंदिरात पाहून ते प्रभावित झाले होते. ‘मातांच्या शक्तीचे प्रतीक म्हणून त्यांनी याकडे पाहिले आणि त्यांनी धैर्याचे प्रतीक म्हणून या मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे ध्येय समोर ठेवले. आता हे मंदिर सर्व एकल माता, विशेषतः शेतकरी महिलांसाठी प्रेरणादायी ठरले आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version