सायन किल्ल्याच्या हौदाला नवा साज…

सायन किल्ल्याच्या हौदाला नवा साज…

मुंबई पुरातत्व विभागाच्या अंतर्गत पोर्तुगीजकालीन ऐतिहासिक सायन किल्ल्यावरील पाण्याच्या हौदाचे पुनरुज्जीवित करण्याचे काम ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. हौदाचे काम करण्यासाठी तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले असून महिन्याभरात काम केले जाणार असल्याने सायन किल्ल्याला एक नवा साज मिळणार.

१५ व्या शतकात ह्या किल्ल्याची निर्मिती झाली असून, पोर्तुगीजकालीन बांधलेल्या किल्ल्याच्या टोकावरील मुख्य बुरुजाच्या खाली हा हौद आहे. ब्रिटिश काळात ‘वॉटर स्टोरेज टॅंक’ ह्या नावाने हौद प्रसिद्ध होता. या हौदाची लांबी ७.९५ मीटर असून, रुंदी ५.८० मीटर आहे. तर खोली ४.१० मीटर आहे. तसेच ५० सेंटीमीटर लांबीची संरक्षण भिंत आहे. अंदाजे २०० वर्षांपूर्वीचा हौद असून, सुमारे ४ फुटापर्यंत गाळ साचला आहे. डागडुजीसाठी पारंपरिक साधनसामग्रीचा वापर करण्यात येणार आहे. हौदाच्या साफसफाईसाठी साधारणतः २१ दिवस लागतील, अशी माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाचे राजेश दिवेकर यांनी दिली.

हे ही वाचा:

‘संजय राऊतांची जागा नवाब मलिकांच्या शेजारी’

“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात  

‘रोहित’चे कौतुक! केला ५०० किमीचा प्रवास २५ तासांत

हौदाच्या जुन्या बांधकामाचे पापुद्रे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे काढण्यात येणार आहेत. तसेच भेगा भरण्यासाठी चुना, गूळ, बेलफळ, उडीद डाळ या मिश्रणाचा लेप बनवून पारंपरिक पद्धतीने भेगा भरण्यात येणार आहे. ” ब्रिटिशकालीन पाण्याचा हौद पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमात अंतर्गत किल्ल्याची डागडुजी करत आहोत. त्यामुळे किल्ल्याला गतवैभव प्राप्त होईल” अशी पुरातत्त्वशास्त्रज्ञ अधीक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी माहिती दिली.

Exit mobile version