32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरधर्म संस्कृतीरौप्यमहोत्सवी वर्षाला डोंबिवलीत 'वसुधैव कुटुंबकम'ची गुढी

रौप्यमहोत्सवी वर्षाला डोंबिवलीत ‘वसुधैव कुटुंबकम’ची गुढी

कचऱ्यातून इंधन निर्मिती, पर्यावरण रक्षण , वृक्षारोपण हे सामाजिक संदेश फक्त गुढीपाडव्याच्या चित्ररथापुरते मर्यादित न ठेवता शहरात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा संकल्प सोडला आहे.

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने वसुधैव कुटुंबकम् हा विचार पुन्हा नव्याने जगभर मांडला जात आहे. सध्या जगभरात सुरु असलेल्या घडामोडी बघता त्याचे महत्व आता सगळ्यांनाच पटू लागले आहे. डोंबिवलीच्या गणेश मंदीर संस्थानने हीच संकल्पना घेऊन यावर्षी नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली आहे. कचऱ्यातून इंधन निर्मिती, पर्यावरण रक्षण , वृक्षारोपण हे सामाजिक संदेश फक्त गुढीपाडव्याच्या चित्ररथापुरते मर्यादित न ठेवता शहरात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा संकल्प सोडला आहे. पृथ्वी म्हणजे एक कुटुंब म्हणजे वसुधैव कुटुम्बकम असे म्हटले जाते. गणेश मंदिर संस्थान गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध उपक्रमातून डोंबिवली शहर वसुधैव कुटुंबामध्ये गुंफणार आहे.

डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानने नववर्ष स्वागत यात्रेची पहिली मुहूर्तमेढ रोवली. आता ही नववर्ष स्वागत यात्रा मुंबई, राज्यात आणि परदेशात पोहचली आहे. यावर्षी डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य्महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्याचवेळी गणेश मंदिर संस्थानने शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे. नववर्ष स्वागत यात्रा हा इव्हेंट नाही तर तो गावकीचा उत्सव आहे ही भावना सुरुवातीपासूनच रुजली असल्यानेच रौप्य्महोत्सवी झेप घेता आली.

वसुधैव कुटुंबकम एक व्यापक संकल्पना आहे आणि सर्व वयोगटातील व्यक्तींच्या सहभागातूनच ती पूर्ण होऊ शकते. पृथ्वीचे संरक्षण करायचे असेल तर आरोग्य, परिसर स्वछता सुरक्षा , निसर्ग, पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, कचरा मुक्त अभियान, शिक्षण याबाबत जागरुक करणारे संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येतील. पर्यावरणाशी निगडित गणेश मंदिराचा एक चित्ररथ असेल. पण नुसता संदेश नाही तर येणाऱ्या काळात यातील काही प्रकल्प प्रत्यक्ष हाती घेण्यात येणार आहेत असे श्री गणेश मंदिर संस्थानचे कार्यवाह प्रवीण दुधे यांनी न्यूज डंका महाराष्ट्रशी बोलतांना सांगितले.

हे ही वाचा:

फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न

संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

कचरा व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट याबद्दल सातत्याने जनजागृती करण्यात आली. आता कल्याण -डोंबिवली महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर घंटागाड्या उपलब्ध करून देणार आहेत. यांत्रिक उपकरणांच्या माध्यमातून रस्ते सफाई करण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता आता झाली आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दुधे यांनी स्पष्ट केले.

कचऱ्यातून सीएनजी इंधन

डोंबिवली शहरात रोज अंदाजे ७०० टन कचरा गोळा होतो. या कचऱ्यातील प्लास्टिकमधून मिळणाऱ्या बीओ इंधनाचे रूपांतर सीएनजीमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठु प्रकल्प उभारण्यात आला आहे. येणाऱ्या काळात महानगरपालिकेची सर्व वाहने सीएनजी वायू वर चालतील त्यामुळे प्रदूषण कमी होईल तसेच डिझेल वरील खर्च कमी होईल. हाच सीएनजी वायू लोकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.

निर्माल्य खताचे व्यवस्थापन

डोंबिवलीतल्या मंदिरांमधून रोज ७०० ते ८०० किलो निर्माल्य गोळा होते. गणेश मंदिराच्या प्रकल्पात गेल्या २२ वर्षापसून निर्माल्याचे खत तयार केले जाते. निर्माल्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आत त्यादृष्टीने नियोजन केले जाणार असल्याचे दुधे यांनी स्पष्ट केले. उद्यानातील पालापाचोल्याची उड्यांतच कंपोस्ट खत टायर करण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात येणार आहे. जुलैमध्ये बीजरोपण करण्यात येणार असून त्यासाठी शाळांमध्ये जनजागृती करण्यात येईल. पर्यावरण रक्षक बघण्यासाठी विविध संस्थांना आवाहन करण्यात आलेले आहे.

पाक कलेतून वेधले भरड धान्याकडे लक्ष

यंदा जगभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरा केले जात आहे. फास्टफूडला फाटा देऊन आपलंच जुने ते सोने ही पारंपारिक पाककृती स्वीकारली तर उलट त्याचा आपल्या आरोग्याला अधिकच फायदा होईल, याच उद्देशाने पाककला स्पर्धा घेण्यात आली. थालिपीठ, नाचणी आणि मोहफुलापासून बनवलेले लाडू, आंबील, भूजा ,राळ्याची खीर, पौष्टिक पाटवड्या, बाजरीची खीर, पौष्टिक काला, भरडधान्याचा जात्याचा केक, प्रवासी मिलेट स्टीक, हुरडा-कांगणी भेळ, मिलेट शीख कबाब, नाचणीचे उकडीचे मोदक, मिलेट ब्राऊनी या अनोख्या पदार्थानी सर्वांचे लक्ष वेधले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा