ऐन दिवाळीत तमाम श्रीराम भक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ज्या मंदिरनिर्माणाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, ते अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर वेगाने उभे राहात आहेच पण ते सर्वसामान्य जनतेसाठी जानेवारी २०२४ला खुले होईल, हेदेखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंदिरातील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील समस्त रामभक्त उत्सुक आहेत.
मकरसंक्रांतीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात होईल आणि त्याच्या दर्शनासाठी भक्त मंदिरात प्रवेश करू शकतील. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय यांनी ही माहिती दिली.
या मंदिराला ३९२ खांब असून १२ दरवाजे असतील. लोखंडाचा कोणताही वापर या मंदिरनिर्मितीत करण्यात आलेला नाही. दगड एकमेकांना सांधण्यासाठी तांब्याचा वापर केला गेला आहे.
हे मंदिर ३५० बाय २५० फूट एवढ्या परिघाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार लोकांची गर्दी होऊ लागल्यानंतर त्याचा नेमका किती प्रभाव पडतो हे लक्षात घेऊन पाच किमी परिसरात काय परिणाम होतात, याची चाचणी घेतली जाणार आहे. १८०० कोटी रुपये या मंदिरा निर्माणासाठी खर्च येणार आहे. आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहितीही चंपत राय यांनी दिली. ज्या वेगाने मंदिराची उभारणी होत आहे, ते पाहता या विश्वस्त मंडळाने समाधान व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज
मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी
श्रीराम मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात १६० खांब असतील तर पहिल्या मजल्यावर ८२ खांब असतील. सागाच्या लाकडापासून बनलेली १२ प्रवेशद्वारे असतील. मुख्य प्रवेशद्वार हे सिंह द्वार म्हणून ओळखले जाणार आहे. मंदिर उभारणीसाठी राजस्थानातून ग्रॅनाइट दगड आणण्यात आले आहेत. हे संपूर्ण मंदिर २.७ एकरात उभे राहणार आहे.