२२ जानेवारीला प्रभू रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडला. प्रभू राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्या प्रसंगी देशभरातून आणि जगभरातून रामललासाठी अनमोल भेटवस्तू आल्या.ही मालिका अजूनही सुरूच असून पुन्हा एकदा अशीच खास भेट रामललासाठी येत आहे. ही भेट तामिळनाडूतील भाविकांकडून पाठवली जात आहे.
तामिळनाडूतील राम भक्तांकडून प्रभू रामांसाठी भेट म्हणून चांदीचे धनुष्य आणि बाण पाठवले जात आहे. हे धनुष्य आणि बाण १३ किलो चांदीचे असून ते अतिशय सुंदर आहे. हे धनुष्य-बाण अयोध्येला पाठवण्यापूर्वी तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये धनुष्य-बाणाची विशेष पूजा करण्यात आली. ज्याचा व्हिडिओही आज समोर आला आहे. राम मंदिराला भाविकांकडून दान केले जाणारे हे धनुष्यबाण अतिशय सुंदर आहे.भाविकांनी हे धनुष्यबाण कांची कामकोटी मठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामीगल यांच्याकडे सुपूर्द केले आणि त्यांनी धनुष्यबाणाची विधिवत पूजा केली.
हे ही वाचा:
गणेश पालकर क्रिकेट क्लबला विजेतेपद
“वैयक्तिक फोटो लीक करून खच्चीकरण करण्याचं काम आप नेत्यांना दिलंय”
उजनी धरण पात्रात बोट उलटून सहा जणांना जलसमाधी!
कॅनडास्थित खलिस्तानी समर्थक अर्श डल्ला, तीन साथीदारांविरुद्ध एनआयएचे आरोपपत्र!
दरम्यान, कडक ऊन असूनही रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. याशिवाय भक्त आपल्या प्रभू रामांसाठी अनेक मौल्यवान भेटवस्तूही आणत आहेत.आतापर्यंत प्रभू रामलल्ला यांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये सोन्याचे धनुष्य आणि बाण, मुकुट, सोने-चांदीचा खडा, अनेक टन वजनाच्या घंटा, रेशमी वस्त्र, चंद्रहार, मौल्यवान दागिने आदींचा समावेश आहे.