मुंबईतील बोरीवली पूर्व येथे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री महालक्ष्मी पूजन’ सोहळ्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. बोरीवली पूर्व येथे यंदा पहिल्यांदाच महालक्ष्मी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेसाठी बोरीवली, दहिसर परिसरातील सुवासिनींनी उपस्थिती दर्शवली. सकाळी १० वाजता पुजेस सुरुवात झाली. श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने या पूजेचे आयोजन केले होते. श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहात या पुजेची तयारी करण्यात आली होती. हिंदू धर्मातील विविध धार्मिक परंपरा, व्रत वैकल्य, सण, उत्सव हे नव्या पिढीला माहिती व्हावेत आणि महालक्ष्मी पूजा करण्यासाठी परिसरातील सुवासिनींची सोय व्हावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सायंकाळी श्री महालक्ष्मी दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.