24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरधर्म संस्कृतीनामस्मरण हेच सर्वस्व सांगणारे गोंदवल्याचे श्री 'ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज'

नामस्मरण हेच सर्वस्व सांगणारे गोंदवल्याचे श्री ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’

सदाकाळ दिवसरात्र मुखी रामनाम घेत घेतला रामनामाचा वसा

Google News Follow

Related

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ,जयाने सदा वास नामात केला,

जयच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीराम

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धारात महाराष्ट्रात काही संत होऊन गेले त्यांपैकीच एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज. सातारा जिल्ह्यातल्या गोंदवले बुद्रुक येथे त्यांचा जन्म मग शुद्ध द्वादशीला झाला. त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ती आणि पंढरीची वारी कधीच कोणी चुकवली नाही. श्रीमहाराजांचे मूळ नाव होते गणेश रावजी घुगरदरे. महाराज नऊ वर्षांचे असताना गुरूच्या शोधात घर सोडून निघून गेले. त्यांच्या घरी रामनाम चालू होते. ते कोल्हापूरला आहेत हे कळल्यावर त्यांचे वडील त्यांना घरी घेऊन आले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षी लग्न लावून दिले पण त्यात त्यांचे चित्त रमेना आणि परत ते गुरूच्या शोधार्थ घर सोडून अनेक सत्पुरुषांच्या भेटीस गेले.

संपूर्ण भारत हिंडल्यावर ते रामदास स्वामींच्या परंपरेतील श्री रामकृष्ण यांना भेटल्यावर त्यांनी त्यांना श्री तुकाराम महाराज यांना येहेळगावी भेटण्याचा सल्ला दिला.तेथे गेल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. तुकाराम महाराजांनी त्यांची खडतर परीक्षा घेऊन त्यांची देहबुद्धी नष्ट करून नऊ महिने त्यांनी तुकाराम महाराजांची सेवा केली. तुकाराम महाराज यांनीच अखेर त्यांना रामनामाचा अनुग्रह ‘श्री राम जय राम जय जय राम’ आणि ‘ब्रह्मचैतन्य’ असे नाव ठेवले. आपल्या सद्गुरूंच्याच आज्ञेवरून त्यांनी तीर्थाटन करून ते नऊ वर्षांनी गोंदवल्याला आपल्या घरी गेले. पुढील काळात त्यांनी श्रीरामनामाचा प्रसार करण्याचे आणि सामान्यांना प्रपंचाला पेलवेल असे परमार्थ दाखवण्याचे काम केले.

हे ही वाचा:

गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी

भाजपचे लढवय्ये आणि अजातशत्रू खासदार गिरीश बापट यांचे निधन

करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजानी सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना , अन्नदान , आणि सगळ्यासाठी प्रेमभाव यावरतीच त्यांनी भर दिला. १८९० पासून श्रींचे वास्तव्य हे गोंदवले मधेच राहिले. आपलय वाड्यातच त्यांनी श्रीरामाचे मंदिर बांधून त्याची स्थापना केली. सगळीकडे रामरायाची उपासना वाढावी या हेतूने अनेक गावांमध्ये राम मंदिराची स्थापना करावी. प्रापंचिक लोकांसाठी अकारण निंदा, छळ , अपमान सोसावा लागला तरी सर्वानी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी नामाचे महत्व पटवून अनेकांना रामनामाचे महत्व पटवून दिले.

एकदा तुम्ही रॅम नाम घेतले कि माझा रॅम तुमची काळजी नक्की घेणार हेच ते आपल्या भजन कीर्तनऊन भक्तांना सांगत असत. श्रीमहाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम घेतले, कानांनी नाम ऐकले , मानाने त्यांच्या नाम कल्पिले, काया वाचा मनाने जगात एक नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य असे मानले नाही. मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५म्हणजेच २२ डिसेंबर १९१३ साली पहाटे ‘जेथे नाम तेथे माझे प्राण , हि सांभाळावी खूण हेच शेवटचे शब्दउच्चारून त्यांनी आपला देह सोडला. आजच्या श्रीराम नवमीच्या निमित्ताने आयुष्यभर रामनामने ओतप्रोत भरलेल्या या महाराजांना साष्टांग दंडवत. ‘श्री राम जय राम जय जय राम’ .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा