छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सईशा प्रोडक्शन्स निर्मित व प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ हे संगीतमय शिवचरित्र ४ जून २०२३ रोजी, रात्रौ ८.१५ वा. पु.ल.देशपांडे मिनी ऑडिटोरियम, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सादर होणार आहे.
सदरहू कार्यक्रमांत अनिल नलावडे यांनी रचलेल्या व संगीतबद्ध केलेल्या रचना – शहाजीराजे – एक पिता, महाराजांची आग्रा येथे नजरकैद, सरनौबत प्रतापराव गुजर, शिवा काशीद, मुरारबाजी देशपांडे, स्वराज्य, सुराज्य आणि सरतेशेवटी सुवर्णकळस म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा..या व अशा अनेक वैविध्यपूर्ण रचना रसिकांना श्रवणीय संगीताच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत.
ही सर्व गीते गायक केतन पटवर्धन, अभिषेक नलावडे, नाजूका वीरकर, ऋषिकेश पाटील व स्वत: अनिल नलावडे सादर करणार आहेत व त्या सुवर्णमयी इतिहासाचे ओघवते निवेदन पद्मश्री राव करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबई अध्यक्ष ऍड. आशीष शेलार उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा:
बहीणभाऊ बुडाल्याचे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झाले उघड
उद्धवजी तुम्ही दिलेली मुदत संपली, आता…?
आसाममध्ये भीषण अपघातात इंजीनियरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू
विद्या पराडकर यांच्या क्रिकेट प्रशिक्षणाचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या संगीतमय सोहळ्याला उपस्थित राहून ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदरहू सांगीतिक उपक्रम सशुल्क आहे. संपर्क – 9821554130