राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह…

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह…

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर आता आज २१ मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे.

शिवसेनेकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T 2) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, शिवसेना खासदार सचिव अनिल देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) दरवर्षी प्रमाणे राज्यभरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. मनसेकडून छत्रपती शिवाजी पार्कवरील छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परिसरात होणार आहे.

हे ही वाचा:

‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’

काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट

आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंतीच्या उत्सवात उपस्थित होते. यावेळी त्यांनी अभिषेक आणि पूजन केले. या सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त, मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील असा विश्वास अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version