उत्तर प्रदेशच्या संभलनंतर आता मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक जुने शिवमंदिर सापडले आहे. मुस्लिमबहुल भागात सापडलेले हे शिवमंदिर भग्नावस्थेत आहे. साधारण ५४ वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली होती असे सांगण्यात येत आहे. राम मंदिराच्या वादानंतर झालेल्या दंगलीत येथे राहणारे हिंदू समाजाचे लोक हा परिसर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आणि येथे मुस्लीम लोकांची वस्ती उभी राहिली यात हे मंदिर कालानुरूप बंद झाले.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात मुस्लीम लोकवस्तीत एक शिवमंदिर भग्नावस्थेत सापडले आहे. नगर कोतवाली परिसरातील खालापार परिसरात ५४ वर्षांपूर्वी १९७० मध्ये भगवान शिवशंकराच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या मंदिराची स्थापना झाली तेव्हा हा परिसर हिंदूबहुल होता असे सांगितले जाते. मात्र, राम मंदिराच्या वादानंतर झालेल्या दंगलीत येथे राहणारे हिंदू समाजाचे लोक हा परिसर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. हिंदू समाजाचे लोक स्थलांतरित होताना त्यांच्यासोबत या मंदिरातील शिवलिंग आणि इतर देवांच्या मूर्ती घेऊन गेले होते. पुढे या परिसरात मुस्लीम समाजाची लोकसंख्या वाढत गेली आणि हे मंदिर जीर्ण झाले. मंदिरातील पूजा थांबली आणि हे मंदिरही बंद झाले.
या भागातील स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्य सुधीर खाटीक यांनी सांगितले की, या मंदिराची स्थापना १९७० साली झाली. राम मंदिराचा मुद्दा तापताच या भागात सांगली उसळल्या आणि इथून हिंदू स्थलांतर करत राहिले. दुसरीकडे मुस्लीम लोकसंख्या वाढत गेली. त्यानंतर येथे पूजा करणे अशक्य झाले. हे पाहून १९९०-९१ मध्ये मंदिरातील मूर्ती दुसऱ्या मंदिरात नेण्यात आल्या. मंदिरात बराच वेळ पूजा झाली नाही तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले. काहींनी घराच्या बाल्कनी काढल्या तर काहींनी पार्किंग केले. मंदिर अवशेष बनले आणि लहान झाले.
हे ही वाचा :
संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?
सौदी अरेबियाच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने त्यांच्याकडील ४,३०० भिकाऱ्यांना टाकले नो फ्लाय लिस्टमध्ये
वीज चोरीच्या मुद्द्यावर संभलमध्ये सपा खासदाराच्या घरी ‘स्मार्ट मीटर’
दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!
दुसरे रहिवासी मोहम्मद समीर आलम यांनी सांगितले की, ही जागा १९७० मध्ये बांधण्यात आली होती. येथे पाल जातीचे लोक असल्याचे वडिलांनी सांगितले होते. मात्र, नंतर त्यांनी आपली मालमत्ता विकून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले. जाताना त्यांनी मंदिरातील शिवलिंग आणि मूर्तीही नेल्या. सध्या मंदिर बराच काळ बंद असून कोणीही दर्शनासाठी येत नाही. एखाद्याला पूजेसाठी यायचे असेल तर तो येऊ शकतो, आम्ही त्याला अडवत नाही. आम्ही कोणाला का थांबवू; हे सार्वजनिक आहे. मंदिर असो किंवा मशीद. मात्र, १९९४ पासून आजपर्यंत कोणीही पूजेला आले नाही.