भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. जोडे मारो आंदोलनही केले. मनसेने देखील राहुल गांधी यांची शुक्रवारची शेगावमधील सभा उधळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यानं रोखले. आता या आंदोलनात शिंदे गट उतरला आहे. शिंदे गटाने रविवारी मुंबईत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली.
सावरकरांच्या विरोधातील वक्तव्याच्या विरोधात शिंदे गट सक्रीय झाल्याचे बघायला मिळाले. दादर आणि मुंबईच्या विविध भागात शिंदे गटाने जोरदार निनिदर्शने करण्यात आली. शिंदे गटातील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हि निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी आणि काँग्रेसचा निषेध या आंदोलनात करण्यात आला.
हे ही वाचा :
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह
धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले
राहुल गांधींनी शेगावमध्ये सावरकरांबद्दल बोलणे टाळले
मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागात शनिवारपासून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. ठाणे , कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीड मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. उल्हासनगरात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्यात आले. कल्याणमध्ये राहुल गांधींच्या फोटोची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली.
सावरकर यांच्या जन्मगावीही निषेध
सावरकर यांच्या नाशिकमधील भगूर या जन्मगावीही निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टी, मनसे आणि बाळसाहेबांची शिवसेना यांनी एकत्र येत येत राहुल गांधी यांच्या विधानाचा भगूर येथील स्मारकाजवळ जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या विधानाच्या विरोधात भगूर येथील ग्रामस्थांनी गाव बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.