हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर नोव्हा संगीत सोहळ्यातून शानी लूक या २३ जर्मन टॅटू कलाकाराचे अपहरण करून गाझा पट्टीत नेले होते. तेव्हा ती ट्रकच्या मागच्या भागात निश्चल असल्याचे आणि तिच्या शरीरावर अमानुष मारहाणीच्या खुणा व्हिडीओत आढळल्या होत्या. त्यानंतर तिचा शिरच्छेद करून तिची विवस्त्र धिंड काढण्यात आली. तिचा मृत्यू झाल्याने तिला पुढचा अनन्वित छळ तरी सहन करावा लागला नाही, अशी प्रतिक्रिया शोकसागरात बुडालेल्या तिच्या आईने दिली आहे.
२३ वर्षांची शानी लूक हे हमासच्या दहशतवादी हल्ल्याचे आणि त्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचाराचे प्रतीक बनली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी किबुत्झ रीम येथे सुरू असलेल्या संगीत सोहळ्यालाच लक्ष्य केले होते. त्यातूनतच तिचे अपहरण करण्यात आले. तिच्या निश्चल देहाची गाझा पट्टीतील रस्त्यावरून धिंड काढण्यात आली होती.
हे ही वाचा:
ड्रग्स माफिया अली असगर शिराझी संबंधिताभोवती ईडीचा फास
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’
मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूर व्हायरल झाला होता. शानी यांची आई रिकार्डा लूक यांनी एका मुलाखतीत ‘तिला किमान पुढचा अनन्वित छळ तरी सहन करावा लागला नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या मुलीचा मृतदेह योग्य ते अंतिम संस्कार करण्यासाठी आपल्याला मिळेल, अशी आशा रिकार्डा यांनी व्यक्त केली आहे.
शानीच्या मृतदेहाच्या सांगाडा आढळला असून तो डीएनए चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आला होता. या चाचणीनंतरच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. डीएनए चाचणीनंतर शानी लूक हिच्या मृत्यूच्या वृत्ताला इस्रायलचे अध्यक्ष इझाक हेरझोग यांनी सोमवारी दुजोरा दिला होता. ‘याचा अर्थ असा की, सर्व अमानुष प्राण्यांनी इस्रायलींवर हल्ला केला. त्यांचा अनन्वित छळ केला आणि त्यांना ठार केले. तिचा शिरच्छेद केला,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.