राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नागपूरमध्ये बोलत असताना म्हणाले की बॉलिवूडमध्ये मुस्लिम समाजाचे मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
देशातील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाचं आणि उर्दू भाषेचं जवळपास सर्वच क्षेत्रात मोठं योगदान आहे. यामध्ये कला, लेखन, कविता यांचा समावेश आहे. त्यामुळेच बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यातही मुस्लिमांचं योगदान मोठं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. बॉलिवडूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक योगदान कोणी दिलेले आहे? बॉलिवूडच्या प्रगतीसाठी मुस्लिम समाजाने सर्वाधिक योगदान दिलेले आहे. याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही,” असे शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
नागपूरमध्ये बोलत असताना त्यांनी मुस्लीम समाजातील वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींवरही भाष्य केले. “देशातील एक मोठा घटक असूनही योग्य सोई- सुविधा मिळत नाहीत, अशी मुस्लिम समाजाची भावना आहे. या भावनेत तथ्य आहे. या सोई-सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील हे सुनिश्चित करण्यासाठी विचारविनिमय व्हायला हवा, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.