शिवछत्रपतींच्या इतिहासात पुन्हा डोकावत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्यावर घसरले आहेत. शिवछत्रपती आणि विचारप्रवाह या श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा पुरंदरेंना लक्ष्य करत टाळ्या मिळविल्या.
पवार म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक पुस्तके लिहिली. पुरंदरेंचं लिखाण पाहिल्यावर शिवछत्रपतींवर इतका अन्याय कुणी केलेला नाही, असे वाटते. या ग्रंथांमधून जी काही मांडणी केली, ती सत्यावर विश्वास आहे तो ही मान्य करणार नाही. नको त्या व्यक्तींचं महत्त्व वाढविण्याचे काम त्यांनी केले. रामदासांचं योगदान काय, दादोजी कोंडदेवांचं योगदान काय यात मी जाऊ इच्छित नाही. खेळाडूंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्य सरकारने कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू, मार्गदर्शक होते का नाही याचा अभ्य़ास केला. यावरून एक निष्कर्ष काढला की, शिवाजी महाराज व दादोजी कोंडदेव यांचा यत्किंचितही संबंध नव्हता. त्यांना जर कुणी मार्गदर्शन केलं असेल तर ते राजमाता जिजाऊंनी. त्यामुळे दादोजी कोंडदेव पुरस्कार काढून टाकण्यात आला. श्रीमंत कोकाटेंनी हे वास्तव चित्र मांडलेलं आहे.
पवार म्हणाले की, शिवछत्रपतींची समाधी कुठे होती याची अनेकांना माहिती नव्हती. ती जबाबदारी फुले यांनी स्वीकारली. जंगलासारखी स्थिती होती, तिथे प्रवेश करणे अवघड होते. झुडुपे बाजुला करून फुले यांनी ती समाधी शोधली. हे करत असताना त्यांनी आणखी एक गोष्ट केली की, शिवछत्रपतींचा उल्लेख त्यांनी कधी छत्रपती म्हणून कधी केला नाही. त्यांनी कुळवाडी भूषण असा केला. मातीशी बांधिलकी असलेला घटक म्हणून उल्लेख केला.
हे ही वाचा:
शिवसेना कुणाची? कागदोपत्री पुरावे सादर करा!
योगी सरकारचा दिलासा; ग्रेटर नोएडामध्ये वीज दर १० टक्क्यांनी कमी
ठाकरेंनी एका माणसासाठी शिवसेना पणाला लावली!
शिंदे सरकारकडून फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी
शिवछत्रपतींचा उल्लेख करताना धर्मांध विचार कसा वाढीला लागेल, मुस्लिमांबद्दल कटुता कशी रुजवली जाईल असा संकुचित विचार मांडला. पण हे वास्तव नव्हतं. हे उदाहरणासह कोकाटे यांनी सांगितले, असे म्हणत पवार यांनी पुन्हा एकदा जुनाच राग आळवला. अनेक ग्रंथ निघाले. अनेकांनी लिखाण केलं. गोविंद पानसरे त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यात शिवाजी महाराजाचं वास्तव चित्रण केलं. ते विसरता येणार नाही. संसदेचे दोन तीन आठवड्यांनी अधिवेशन संपलं की, मी तुमच्यासोबत बसेन एक उपक्रम हाती घेऊ. सत्यावर आधारित, नव्या पिढीला प्रेरणा देणारा इतिहास पाहिजे, पाखंडी इतिहास नको.