शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे ९९ व्या वर्षी निधन

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे रविवार, ११ सप्टेंबर रोजी निधन झाले.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे ९९ व्या वर्षी निधन

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे रविवार, ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९९ व्या वर्षी मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशात आणि विदेशात त्यांचे अनेक अनुयायी आहेत.

मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या ९९ व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू मानले जातात.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन हिंदूंच्या श्रद्धेचे आधारस्तंभ आहेत. जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते.

हे ही वाचा:

नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला होता.

Exit mobile version