उत्तर प्रदेशमधील अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी ‘न भूतो न भविष्यति’ असा राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी देशासह संपूर्ण जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. अशातच देशभरातून रामभक्त पावन अशा अयोध्या भूमीवर पोहचणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून राम मंदिरासाठी अनेक अनोख्या भेटवस्तू लोक पाठवत आहेत. अशातच एक मुस्लीम तरुणी मुंबईहून अयोध्या गाठण्यासाठी पायी निघाली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शबनम शेख असं या तरुणीचे नाव असून ही तरुणी पाठीवर समान घेऊन मुंबईहून अयोध्येला जाण्यासाठी म्हणून पायी निघाली आहे. आपण भारतीय सनातनी मुसलमान असल्याचं ही तरुणी सांगत आहे. जय श्री राम असा नारा देत ती ही पदयात्रा करत आहे. तिच्या पाठीवर सामनासोबत हिंदुत्वाचे प्रतिक असणारा भगवा झेंडा आहे तर एक फलक देखील लावला आहे. या फलकावर राम मंदिराचा फोटो असून त्यावर श्री राम असे लिहिले आहे. तसेच मुंबई ते राम मंदिर (अयोध्या) पद यात्रा असेही हिंदीत लिहिले आहे. याशिवाय तिने समाजाला एक संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया’; ‘पर्यावरण वाचवा’ असे संदेश सुद्धा तिने लिहिले आहेत.
आयोध्येत तू किती दिवसांनी पोहचणार; किती वेळ लागणार असे प्रश्न तिला विचारले असता तिने सांगितले की, “त्याची काही कल्पना नाही. प्रभू रामाचे नाव घेऊन या प्रवासाला सुरुवात केली आहे. कितीही वेळ लागू देत आता या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे.”
यह शबनम भारतीय मुस्लिम है, जो मुंबई से अयोध्या की यात्रा पर है।
भारत के कट्टरपंथियों को इस महिला से बहुत कुछ सीखने की जरूरत है। https://t.co/8rsOT5khF3 pic.twitter.com/FWR56lJ4yk
— Pt. Shrikant Upadhyay (parody) 🇮🇳 (@Shreekantryvbjp) December 21, 2023
हे ही वाचा:
समुद्रीचाच्यांना रोखण्यासाठी अदनच्या खाडीत आयएनएस कोच्ची, कोलकाता तैनात
‘फुटीरतावाद्यांविरोधात कॅनडा कारवाई करेल, ही आशा’
चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आइसलँडकडून ‘इस्रो’चा सन्मान
भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य हस्ते अयोध्येला प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी २ हजार ५०० पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय ४ हजार साधु संतांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तर, २३ जानेवारीपासून मंदिर भक्तांसाठी खुले राहणार आहे. या कार्यक्रमासाठी १९९२ मध्ये प्राणांची आहुती दिलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. २३ जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना भव्य राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.