पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा

सीमाने तुळशीला पाणी देऊन सुखी भविष्यासाठी केली प्रार्थना

पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा

ग्रेटर नोएडा येथील सचिन मीणा याच्या प्रेमात पडून आपल्या चार मुलांसह पाकिस्तानमधून पळून आलेल्या सीमा हैदरने स्वत:ची वेशभूषा, चालिरीती आणि खाण्या-पिण्याच्या सवयीतही बदल केले आहेत. सीमा हैदर करत असलेल्या पूजा-अर्चेमुळे स्थानिक लोकही बुचकळ्यात पडले आहेत.

 

सीमाने रविवारी विधिवत तुळशीचे पूजन केले. त्यावेळी तिने गळ्यात लाल रंगाचा स्कार्फ परिधान केला होता. त्यावर राधे-राधे लिहिले होते. सीमाने तुळशीला पाणी देऊन सुखी भविष्यासाठी प्रार्थना केली. नंतर तिने सासू-सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले. सीमा आता सचिनच्या नावाचे मंगळसूत्र आणि भांगेत कुंकूही लावत आहे.

 

सीमाने सांगितले की, पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचे चित्रपट खूप पाहिले जातात. तिने स्वत: मोबाइलवर खूप हिंदी चित्रपट पाहिले आहेत. सीमाने नेपाळमध्येसुद्धा सचिनसोबत बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर रील्स बनवले होते. भारतीय वेशभूषा आणि पद्धतीबाबत तिला बरेच काही माहीत आहे. तसेच, तेनाली रामा मालिका बघून ती हिंदी भाषा बोलण्यास शिकली आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन टॉपला; दहशतवादी संघटनांमधील भर्तीही झाली कमी

मार्ग मोकळा झाला; विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरच नियुक्ती

विक्रम मोडत ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने एका दिवसात केली ‘एवढी’ कमाई

उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असावा

सीमाने सचिनच्या प्रेमाखातर तिच्या आवडत्या पदार्थांनाही सोडचिठ्ठी दिली आहे. कधी मोठ्या आवडीने चिकन बिर्यानी खाणारी सीमा सचिनसाठी आता संपूर्ण शाकाहारी झाली आहे. तिने मांस-मच्छीचा त्याग केला आहे. सचिनच्या घरी तर लसूणही खाल्ले जात नाही. सीमाने सांगितले की, ती मार्च महिन्यातच सचिनला नेपाळमध्ये भेटली होती. सचिनची भेट घेतल्यानंतर तिला तिचे स्वप्नच पूर्ण झाल्यासारखे वाटले. तिथेच सचिनने सीमाच्या भांगेत कुंकू लावून तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते. त्यानंतर सीमाने हिंदू धर्म स्वीकारला होता.

Exit mobile version