कर्नाटकात सध्या हिजाबचे प्रकरण गाजते आहे. त्यावरून देशात वातावरण बिघडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटकातील बागलकोट येथे दिसलेले दृश्य चिंतेत भर घालणारे आहे.
बागलकोटमधील एक व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात एका शाळेच्या इमारतीत नमाज पढताना मुली दिसत आहेत. हा व्हीडिओ पाहून सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली गेली आहे. शाळेत अशी प्रार्थना करण्यास कशी काय परवानगी दिली जाऊ शकते, अशी विचारणा लोक करत आहेत.
बागलकोटमधील ही सरकारी शाळेची इमारत असून त्यात हा प्रकार होत आहे. वर्गाच्या खोल्यांच्या समोरच पथारी पसरून मुली नमाज अदा करताना दिसत आहेत. अशा गोष्टी देशासाठी हानिकारक आहेत, अशी मते सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागली आहेत.
मेघ अपडेट्स या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हीडिओ सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. मनीष मुंद्रा यांनी हा व्हीडिओ शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारांमुळे भारत मागे जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात थरारक कारवाई
‘जे पंतप्रधानांना सुरक्षित रस्ता देऊ शकले नाहीत, ते राज्य काय सुरक्षित ठेवणार’
पाकिस्तानात ईशनिंदा केल्याच्या संशयावरून लोकांनी वीटांनी मारले
कर्नाटकमध्ये असाच एक व्हीडिओ शाळेत नमाज पढतानाचाही मध्यंतरी व्हायरल झाला होता. तर एका शाळेतील प्राचार्यांनी मुलांना शुक्रवारी नमाज अदा करण्याची परवानगी दिल्याचे प्रकरणही समोर आले होते.
आता कर्नाटकात उडुपी येथे एका कॉलेजमधील सहा मुलींनी आम्हाला वर्गात हिजाब घालण्याची मागणी करत आंदोलन केले होते. त्याचे पडसाद देशभरात उमटले. देशातील विविध राज्यात हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू झाली. त्याला विरोध करण्यासाठी मग हिंदुत्ववादी संघटनांनीही आंदोलने केली.
Now video of girls offering Namaz in govt school, Bagalkot dist , Karnataka going viral pic.twitter.com/Tpx4rehORk
— MeghUpdates🚨™ (@MeghBulletin) February 13, 2022