सावित्रीबाई फुले देवी सरस्वतीला आवाहन करत असत…

सावित्रीबाईंच्या काव्यफुलेमध्ये देवी सरस्वतीला करण्यात आले आहे आवाहन

सावित्रीबाई फुले देवी सरस्वतीला आवाहन करत असत…

देवी सरस्वतीचा किंवा देवी शारदेचा फोटो कशाला शाळेत हवा, त्यापेक्षा तिथे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा व्हायला हवी, असे विधान महाराष्ट्रीचा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले असले तरी त्यांची ही विधाने कोणत्याही अभ्यासाशिवाय केलेली आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. यावरून आता सोशल मीडियावर भुजबळ यांना लक्ष्य करण्यात येत असून त्यांना सावित्रीबाई फुले यांची भूमिका देवी सरस्वतीसंदर्भात काय होती, याचे दाखलेच दिले जात आहेत.

काव्यफुले हा सावित्रीबाई यांचा काव्यसंग्रह आहे. यात सावित्रीबाई यांनी काय लिहिले आहे, त्याचे दाखले दिले जात आहेत. इतिहासतज्ज्ञ पार्थ बावस्कर यांनी याबाबत म्हटले आहे की, काव्यफुलेमध्ये सावित्रीबाई पुस्तकाच्या प्रारंभीच जे म्हणतात त्यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते.

सावित्रीबाईंच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वतीचे चित्रही आहे. त्याच्या प्रारंभी लिहिले आहे की,

शिव तुझे जपू दे स्तोत्र

प्रेम भावे गातसे मी

विश्वंभरा तू महेशा

सदभावे तुला वंदी

ज्याच्यामुळे या जगाची निर्मिती झाली आहे जो त्रैलोक्याला आपल्या बळावर सांभाळू शकतो. त्या शंकराकडे मी वर मागते की त्याने माझ्या जिव्हेवर बसून काव्यरचना करून घ्यावी

बावस्कर म्हणाले की, हे सगळे प्रकरण सुरू असताना मला सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा काव्यफुले हा कविता संग्रह आठवला. याची सुरुवात केली तेव्हा सावित्रीबाईंनी तरी शंकर महादेव कुठे बघितला होता? ज्या देवांच्या अस्तित्वावर भुजबळांना शंका आहे त्या सावित्रीबाईंना मात्र तो मान्य आहे.

हे ही वाचा:

बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उध्वस्त करणारे ‘ऑपरेशन गरुड’

हिजाब विरोधामुळे आता इराकही लक्ष्य

आयकर कार्यालयावर अजगराची ‘रेड’

आणखी एका डिलिव्हरी बॉयने तरुणीची छेड काढली

बावस्कर यांनी सांगितले की, सावित्रीबाईंनी शाळेला सरस्वतीचा दरबार असा उल्लेख केला आहे. त्या लिहितात की,

सरस्वतीचा दरबार

खुला जाहला पाहू चला

शाळेमधुनी शिकूनी घेऊ

ज्ञान मिळवू चला ग चला

सरस्वतीच्या या दरबारात

शिक्षण घेणे जाऊ चला

विद्यादेवीस प्रसन्न करुनी

वर मागू तिजला चला

यावर छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र राज्यात विविध ठिकाणी भाजपाने आंदोलकन करत देवी सरस्वतीच्या फोटोचे पूजन केले आहे त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे फोटो लावून त्यांची पूजा केली आहे.

Exit mobile version