26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीसौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

जगभरात यासंदर्भात उमटत आहेत विविध प्रतिक्रिया

Google News Follow

Related

सौदी अरबमध्ये २२ मार्चपासून रमझान महिना सुरु होत आहे. सौदी अरेबियाने रमजान संदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता सौदीतील मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या इस्लामिक मंत्रालयाने रमजानच्या निर्बंधांशी संबंधित १० मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत.
या मार्गदर्शक तत्वानुसार रमजानमध्ये मेजवानी इफ्तारसाठी देणगी मागण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यापुढे इफ्तार मशिदीच्या आत दिली जाणार नाही, तर फक्त बाहेरील भागात दिली जाणार आहे. इमाम या इफ्तारची काळजी घेतील असे यामध्ये म्हटले आहे.

अजानचे थेट प्रक्षेपण होणार नाही. रमजानच्या संपूर्ण महिन्यात मशिदींमध्ये इमामाची उपस्थिती आवश्यक असेल. जेव्हा ते खूप महत्वाचे असेल तेव्हाच त्यांना रजा मिळू शकेल. यासोबतच इतर नमाज्यांनाही योग्य वेळ मिळावा यासाठी इमामांना वेळेवर नमाज अदा करावा लागेल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

परदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

परदेशी आईचा मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

विमानात सिगारेट पिणाऱ्या आणि दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाने घातला गोंधळ

मुलांना नमाज पठण करण्यास मनाई यासोबतच मुलांना मशिदीत नमाज अदा करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.या वादग्रस्त निर्बंधांवर जगभरातील मुस्लिमांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सार्वजनिक जीवनातील इस्लामचा प्रभाव कमी करण्याचा सौदी सरकारचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात येत आहे.सौदीचे राजकुमार सलमान परदेशी लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकाकारांचे मत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा