दीपावली दरम्यान वाढलेली गर्दी लक्षात घेऊन वणी येथील श्री सप्तशृंगी मंदिर २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. मंदिर २७ ऑक्टोबर पासून ते १३ नोव्हेम्बरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी २४ तास उघडे ठेवून श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.
दिवाळी सणाच्या कालावधीत राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. इतरवेळीही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. गेल्या २ वर्षातील कोविड निर्बंधामुळे राज्यातील भाविकांना मंदिरात जात येत नव्हते. परंतु आता निर्बंध दूर झाल्याने भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. नवरात्रतही विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती. दिवाळी सुट्टीच्या काळातील उसळणारी गर्दी लक्षात घेऊन ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले
शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा
या १५ दिवसांच्या काळात भाविकांसाठी मंदिरामध्ये भाविकांसाठी २४ तास दर्शन व्यवस्था असेल. गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य देवू करावे, असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, श्री भगवती मंदिरात पर्यवेक्षक, सेवक, सुरक्षा रक्षक, सहाय्यक आणि धर्मादाय कार्यालयातील कर्मचारी यांची विभागणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता आणि भाविकांसाठी टोइंग ट्रॉलीची सुविधाही करण्यात आली आहे.