31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरधर्म संस्कृतीप्रसादाच्या लाडूला पुन्हा मिळाले पावित्र्य

प्रसादाच्या लाडूला पुन्हा मिळाले पावित्र्य

Google News Follow

Related

तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या मुद्यानंतर देशभरात गदारोळ निर्माण झाला असून केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी व्यक्त केला आहे. यानंतर आता तिरुमला तिरुपती देवस्थानम यांनी प्रसादाच्या लाडूंविषयी माहिती दिली आहे.

मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येत असलेल्या लाडूंचे पावित्र्य पुनर्स्थापित करण्यात आले असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानमने दिली आहे. देवस्थानमच्या वतीने एक्स पोस्ट करून ही माहिती देण्यात आलेली आहे. प्रसादाच्या लाडूंच्या दर्जाबद्दल भाविकांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे लाडू बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलून आम्ही तुपाचे नमुने बाहेरच्या प्रयोगशाळेत तापसणीसाठी पाठवले. त्यात तुपात काही बाह्य घटक दिसून आले, असे एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

तुपाची तपासणी करण्यासाठीची यंत्रसामुग्री नसल्याचा फायदा तूप पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी घेतला. आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने ही यंत्रसामुग्री देणार असल्याचे सांगितले आहे. प्रिमिअर अॅग्रीफूड, कृपारम डेअरी, वैष्णवी, पराग मिल्क आणि ए. आर. डेअरी असे पाच पुरवठादार तूप पुरवतात. यातील ए. आर. डेअरीकडून आलेले तूप कमी दर्जाचे दिसून आले आहे. ट्रस्टने तातडीचा उपाय म्हणून तुपाचा पुरवठा थांबवला असून गुणवत्ता तपासणीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे, असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा..

हवाई दलाच्या प्रमुख पदी एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती

तिरुपती लाडू प्रकरण ; पुरवठादार काळ्या यादीत

टीडीपी नेते गांडी बाबाजींचा वायएसआर काँग्रेसवर हल्लाबोल

तिरुपती लाडू प्रकरण; जगनमोहन यांचेच हे षडयंत्र!

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी तिरुपती लाडू प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे. सरकार या प्रकरणाची अधिक चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे आश्वासन नड्डा यांनी दिले आहे. जेपी नड्डा म्हणाले की, “मला या प्रकरणाची बातमी मिळताच मी चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आणि त्याबद्दल माहिती घेतली, मी त्यांना त्यांच्याकडे असलेला अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. मी त्याची चौकशी करेन आणि राज्य नियमकाशी देखील बोलेन आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेईन. अहवालाची सखोल चौकशी केल्यानंतर, कायद्यानुसार आणि आमच्या FSSAI च्या कक्षेत येणाऱ्या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा