सरसंघचालक मोहन भागवत, इस्रो प्रमुख सोमनाथ यांच्याकडून ‘सनातन’चे कौतुक!

विवान कारुळकरचे दुसरे पुस्तक ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल टेकनॉलॉजी’ प्रकाशित

सरसंघचालक मोहन भागवत, इस्रो प्रमुख सोमनाथ यांच्याकडून ‘सनातन’चे कौतुक!

विवान कारुळकर याने वयाच्या १६ व्या वर्षी ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स’ हे सनातन धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधांवरील तसेच विज्ञानाचे खरे मूळ हे सनातन धर्मातच आहे हे सांगणारे पुस्तक लिहिले. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून जगभरातून त्याच्या पुस्तकाची दखल घेतली जात आहे. अशातच आता विवान कारुळकर याने त्याचे दुसरे पुस्तक ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल टेकनॉलॉजी’ लिहिले आहे. हरियाणामधील गुरूग्राम येथील एसजीटी विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

विवान कारुळकर याच्या ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स’ या पुस्तकाला रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या चरणांपाशी हे पुस्तक ठेवून भगवंतांचे आशीर्वादही घेतले आहेत. चंपतराय यांनी पुस्तकाबद्दल आपल्या भावना पहिल्या पानावर लिहिल्या असून त्यातून विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यानंतर विवान याने ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल टेकनॉलॉजी’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आणले आहे. हरियाणामधील गुरूग्राम येथील एसजीटी विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये ‘नॅशनल कॉन्फरेन्स फॉर रिसर्च स्कॉलर्स ऑफ भारतीय शिक्षण मंडळ युवा आयाम, विविभा २०२४’ कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन पार पडले.

प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे पुत्र विवान कारुळकर याने लिहिलेल्या ‘सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ या पुस्तकाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून विवानच्या पुस्तकाचे कौतुक होत आहे. विवानच्या पुस्तकाला लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. त्याला बॅज आणि नाणे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. या नाण्यांमध्ये राणीचा मुकुट असून तो टॉवर ऑफ लंडनवर देखील दिसून येतो. अशी नाणी फक्त तीन बनवली गेली असून यातील तिसरे नाणे विवानला सादर करण्यात आले आहे.

विवान कारुळकरने लिहिलेल्या या पुस्तकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून अवघ्या १६ व्या वर्षी हे पुस्तक लिहून सनातन धर्माचा प्रसार-प्रचार करत असल्याबद्दल शाबासकीही दिली आहे. भारतीय सेनादलाने विवानला धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरविले. देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनाही विवान याने त्याच्या पुस्तकाची प्रत प्रदान केली होती. त्यांच्याकडूनही त्याला शाबासकी मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना राजभवन येथे या पुस्तकाची प्रत विवानने सहकुटुंब प्रदान केली तेव्हा राज्यपालांनी विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि हाच नवा भारत असल्याची प्रतिक्रियाही दिली.

हे ही वाचा : 

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी पाकिस्तानातला ‘व्हीआयपी’

व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद! रवींद्र वायकरांना दिलासा

झाशीमध्ये अग्नितांडव; रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, नेते गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस. के. जाधव यांनीही विवानच्या या प्रयत्नाबद्दल त्याला शाबासकीची थाप दिली.

Exit mobile version