हो गया काम; जय श्रीराम

हो गया काम; जय श्रीराम

जगातील सर्वात मोठ्या निधी संकलन मोहिमेची आज सांगता झाली. मर्यादापुरूषोत्तम रामाच्या अयोध्येतील मंदिराच्या निर्माणासाठी ४४ दिवस चालवण्यात आलेल्या समर्पण निधी अभियानाची सांगता झाली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने १५ जानेवारीपासून सुरू झालेले अभियान माघ पौर्णिमेच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी समाप्त झाले. या अभियानात ₹१९०० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

हे ही वाचा:

“सोमवारच्या आत संजय राठोडांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही” – चंद्रकांत दादा पाटील

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार श्री गोविंद गिरी यांनी सांगितले की आत्तापर्यंत ₹१९०० कोटी जमा झाले आहेत. हा निधी ₹२००० कोटींच्या पलिकडेही जाऊ शकतो. कारण अजूनही काही धनादेश विविध बँकांकडे क्लिअर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे नक्की किती रुपयांचा निधी जमा झाला आहे, हे काही काळाने सांगता येईल.

या विश्वस्त मंडळाचे सभासद डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार हा निधी ₹२५००कोटींच्या वर असू शकतो, कारण समर्पण निधी अभियान उत्तर प्रदेशात समाप्त होत आहे. मात्र ज्या राज्यांत ते उशिरा चालू झाले, तिथे ते अजून काही काळ चालणार आहे.

हे अभियान अतिशय यशस्वी झाले आहे. या अभियानाने भारतातील सर्व जात-पात, धर्म असे सगळे भेद तोडले. समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी समर्पण निधी अभियानासाठी देणगी दिली. या दानाने दाखवून दिले आहे, की श्री रामच अजूनही भारतातील लोकांचे पूर्वज आहेत.

या विश्वस्त मंडळाची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी पूर्णत्वास गेली. विश्वस्त मंडळाने मंदिर बांधकामासाठी वैदिक पद्धत अनुसरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ डॉ नागस्वामी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

प्राचीन अयोध्या नगरीच्या बांधकामासाठी लार्सन ऍंड टुब्रो आणि कुकरेजा आर्किटेक्ट सोबतच कॅनडातील एलईए असोसिएट्स साऊथ एशिया लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नरेंद्र मोदींसमोर अयोध्येबद्दलची सर्व योजना त्यांच्या मान्यतेसाठी मांडणार आहेत. केंद्र सरकारने अयोध्या विमानतळाच्या विस्तारासाठी ₹२५० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Exit mobile version