नमाजासाठी जागा असेल तर हिंदूंसाठी मंदिर का नाही!

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मंदिर बांधण्याची मागणी

नमाजासाठी जागा असेल तर हिंदूंसाठी मंदिर का नाही!

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मंदिर बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. मुस्लिमांप्रमाणे अन्य धर्माच्या नागरिकांनाही प्रार्थना करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. सरकार जागा उपलब्ध करून देणार नसेल तर मुंबई विमानतळावरील नमाजाची ठिकाण बंद करावे अशी मागणी नाशिकमधील संतांनी केली आहे.

अंजनेरी नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात विमानतळ परिसरात हिंदूंना प्रार्थना करण्यासाठी जागा असावी, अशी मागणी केली आहे. संविधानानुसार सर्वांना समान अधिकार असायला हवेत. विमानतळावर मुस्लिमांच्या नमाज पठणासाठी प्रार्थना कक्ष असताना इतर धर्मीयांसाठीही अशी व्यवस्था करावी, असे महंत अनिकेत शास्त्री यांनी पत्रात म्हटलं आहे.

हे ही वाचा:

लखनौमध्ये पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळली .. अनेक ढिगाऱ्याखाली अडकले

अंधश्रद्धेतून सात जणांचे भयंकर हत्याकांड,

बीबीसी माहितीपटाच्या विरोधानंतर अनिल अँटनी यांचा काँग्रेसला रामराम

“जग बदलण्याची ताकद फक्त एका मतात”

महंत अनिकेत शास्त्री यांच्या या मागणीवर सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. सरकारने इतर धर्मीयांसाठी प्रार्थनास्थळांची व्यवस्था न केल्यास नमाज कक्षही बंद करावा, असेही महंतांनी पत्रात म्हटले आहे. अंजनेरी नाशिक पीठाधीश्‍वर अनिकेत शास्त्री बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांना पाठिंबा दिल्यानंतर चर्चेत आले आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केवळ हिंदू धर्मियांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता याआधी महंत अनिकेत शास्त्री यांनी ओझर येथील विमानतळाला जटायू असे नाव देण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा विमानतळावरुन त्यांनी नव्या कागणीकडे लक्ष वेधले आहे.

Exit mobile version