‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील सर्व वर्ग आणि समाजाच्या नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. हेच रामराज्य आहे,’ असे प्रतिपादन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले आहे. ‘प्रभू रामाला न्याय, मर्यादा आणि वचनबद्धतेसाठी मानले जाते. त्यांच्या बालस्वरूपाची अयोध्येत प्रतिष्ठापना होणे ही सौभाग्यपूर्ण बाब आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत त्यांनी देशाने निवडलेले नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे, असेही नमूद केले आहे.
‘या प्रसंगाची लोक ५०० वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. ही प्रतीक्षा त्या प्रक्रियेसाठी होती, जी प्रक्रिया आज होत आहे. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण त्या मूल्यांची साक्षात उभारणी आहे, ज्यासाठी हिंदू जगत आहेत. रामराज्यचा अर्थ असा नव्हे की आपण धनुष्यबाण चालवल्या जाणाऱ्या काळात परतू. मात्र हे ती मूल्ये आणि भावनांची बाब आहे, ज्यात सर्वांच्या कल्याणासाठी व्यक्तिगत हिताचा त्याग केला पाहिजे. जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःला आणखी श्रेष्ठ करण्यासाठी झटेल,’ असे सद् गुरू यात म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
बलोच फुटीरतावाद्यांची पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा!
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर भाजपची मोठी तयारी, देशभरात पंतप्रधानांच्या १४० सभा!
अयोध्येतील भुतो न भविष्यती सोहळा अनुभवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी
अनुष्ठानाचा अर्थ ज्या देवतेच्या पूजेची आपण तयारी करत आहोत, त्या देवतेचे देवत्व आणि त्यांच्या गुणांना शरीर, मन आणि आत्म्यामध्ये समाविष्ट करणे हा आहे. देशात रामराज्याची स्थापना करण्यासाठी केवळ मोदीच नव्हे तर सर्व नेते आणि भारतीयांनी अनुष्ठान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. अनुष्ठान आपल्याला नियम-संयम जगण्याचे शिकवतो आणि रामराज्याचा अर्थही असा समाज, ज्यात सर्वजण कायद्याचे पालन करतील, असा आहे, असेही त्यांनी सांगितले.