प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी आरएसएसचा ‘हरित महाकुंभ’ उपक्रम

पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट

प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी आरएसएसचा ‘हरित महाकुंभ’ उपक्रम

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभ मेळाव्यासाठी म्हणून देशासह जगभरातून भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासन प्रयत्नशील आहेत. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) सोमवारी पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ‘हरित महाकुंभ’ उपक्रम सुरू केला आहे. कापडी पिशव्या आणि स्टील प्लेट्सचे वाटप करून परिसरात कचरा कमी करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

‘हरित महाकुंभ’ अंतर्गत ३१,००० कापडी पिशव्या आणि १६,००० स्टील प्लेट्सचे वाटप करून परिसरातील कचरा कमी करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. स्थानिक कामगार आणि सोसायटी सदस्य मेळाव्या दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी या वितरणाचे नेतृत्व करत आहेत. हरित महाकुंभ २०२५ च्या आधी अलिगढ ते प्रयागराज येथे साहित्य पाठवण्याच्या पहिल्या टप्प्यात ‘बॅग आणि थाली अभियान’चा हा एक भाग आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना, अलिगडमधील आरएसएसचे सह-प्रभारी रतन जी म्हणाले की, “आज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्ही प्रयागराज महाकुंभासाठी हरित महाकुंभ हा उपक्रम सुरू केला आहे. पर्यावरण शुद्धीकरण आणि संरक्षणासाठी योगदान देण्यासाठी आम्ही ३१,००० कापडी पिशव्या आणि १६,००० स्टील प्लेट्स पाठवत आहोत.”

हे ही वाचा..

वाल्मिक कराडसोबत फोटो व्हायरल; एसआयटीमधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी

छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक

कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?

केजरीवाल यांचा ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करा!

पर्यावरण संरक्षण उपक्रमाच्या प्रमुख डॉ. नीलम श्रीवास्तव म्हणाल्या की, “आमचे सामूहिक उद्दिष्ट हे कार्यक्रमादरम्यान स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे आरोग्य राखणे हे आहे. निरोगी वातावरणामुळे निरोगी भारत आणि स्वच्छ भारत, जे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. हे आम्हाला निसर्ग आणि पर्यावरणाप्रती संवेदनशीलता व्यक्त करण्यास अनुमती देते. हा उपक्रम डिस्पोजेबल वस्तूंचा वापर कमी करण्याचा संदेश देतो, ज्यामुळे कचरा कमी जमा होण्यास आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यास महत्त्वपूर्ण योगदान होते. अशी हानी कमी करून, सर्वांसाठी एक चांगले राहणीमान वातावरण निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.

Exit mobile version