संघाच्या ‘रोटी डे’ उपक्रमामुळे अनेक गरजवंतांची होळी झाली सुखाची

संघाच्या ‘रोटी डे’ उपक्रमामुळे अनेक गरजवंतांची होळी झाली सुखाची

समाजसेवेचा वारसा जपत समाजच्या प्रत्येक घटकाचा विचार करून कार्य करणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. समाजाचा प्रत्येक घटक आपला बांधव आहे आणि आपण त्याचे काहीतरी देणे लागतो ही भावना संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या ठायी असते. त्यामुळे सणाच्या वेळी समाजातील गरजवंतांचा विचार करून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी संघ स्वयंसेवक सदैव कार्यरत असतात. असाच एक आगळावेगळा उपक्रम ठाण्यातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गेली काही वर्ष राबवत आहेत. तो म्हणजे ‘रोटी डे’.

महाराष्ट्रात होळी आणि रंगपंचमीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीतले हे सण म्हणजे समाजाने एकत्र येत एकोपा वाढवण्याची परंपरा. पण आपल्या समाजात असेही घटक आहेत ज्यांना दोन वेळचे अन्नही मोठ्या मुश्किलीने मिळते. अश्यावेळी आपण सण साजरा करत असताना आपल्या अशा गरजू बांधवांसाठीही काहीतरे करावे म्हणून ठाण्यात दर वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सयंसेवक ‘रोटी डे’ साजरा करतात.

हे ही वाचा:

उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

राज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

होळीच्या काही दिवस आधीपासून समाजाला पुरणपोळी देण्याचे आवाहन करण्यात येते. लोकही या उपक्रमाला सढळ हस्ते मदत करतात. होळीच्या रात्री या जमा झालेल्या पुरणपोळ्या समाजातील गरजवंत बांधवाना वाटण्यात येतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारने कोविडचे कारण पुढे करत होळीवर बंदी घालण्याचा फतवा काढला होता. पण तरीही कोविडची नियमावली पाळून सामाजिक भान जपत ‘रोटी डे’ मात्र साजरा करण्यात आला. ठाण्यातील नागरिकांनीही या उपक्रमाला भरभरून पाठिंबा देत २०३२ पुरणपोळ्या जमा झाल्या. त्यानंतर संघाच्या स्वयंसेवकांतर्फे ठाण्याच्या विविध भागातील गरजू बांधवाना या पुरणपोळ्या वाटण्यात आल्या. सणाच्या निमित्ताने शक्य त्यांच्या आयुष्यात आनंद वाटण्याचा हा एक सोहळा होता.

Exit mobile version