कर्णावती येथे रा.स्व.संघाची प्रतिनिधी सभा

कर्णावती येथे रा.स्व.संघाची प्रतिनिधी सभा

जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पार पडत आहे. रा. स्व. संघ आणि विचार परिवारातील समविचारी संघटना यांची ही प्रतिनिधी सभा दरवर्षी पार पडते. यावेळी गुजराथ राज्यात कर्णावती येथे आज म्हणजेच शुक्रवार, ११ मार्च पासून ही प्रतिनिधी सुरू झाली आहे. तर रविवार, १३ मार्च पर्यंत ही सभा चालणार आहे. या सभेत संघ आणि संघ विचारांच्या विविध संघटनांचे एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस ( १,२४८ ) प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ही प्रतिनिधी सभा पार पडत आहे. यावेळी गेल्या वर्षभरात जगभर पार पडलेल्या रा. स्व. संघ आणि समविचारी संघटनांच्या कार्याचा आढावा घेतला जाईल. तर त्यासोबतच भविष्याच्या दृष्टीने काही कार्यक्रमांची आखणी केली जाईल. तर या व्यतिरिक्त तीन दिवसांच्या या सभेत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असून काही ठराव होणार आहेत.

हे ही वाचा:

‘कळसूत्री सरकारचा पंचसूत्री अर्थसंकल्प’

निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

हा तर उधारीचा वायदा करणारा अर्थसंकल्प

योगी पुन्हा मुख्यमंत्री होणार, मग मुनव्वर राणा कुठे जाणार?

कोरोना आपत्तीत देशभरातील पाच लाख पन्नास हजार स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या सेवा कार्यात सहभाग घेतला आहे. तर २०१७ ते २०२१ दरम्यान जॉईन आरआरएस या संघाच्या संकेतस्थळावर नोंद करून वयोगट २० ते ३५ मधील जवळपास १ लाख २५ हजार युवक रा.स्व.संघाच्या विविध कामात जोडले गेले आहेत. तर दोन वर्षांच्या कोरोना आपत्तीच्या काळानंतर संघाच्या देशभरातील ९८.६% शाखा सुरू झाल्या आहेत.

Exit mobile version