राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या ओरिसा दौऱ्यावर आहेत. मंगळवार २४ ऑगस्ट पासून या दौऱ्याला सुरुवात झाली असून काल म्हणजेच गुरुवार २६ ऑगस्ट रोजी या दौऱ्याचा तिसरा दिवस होता. दौऱ्याच्या या तिसऱ्या दिवशी मोहन भागवत पुरी येथे होते. यावेळी त्यांनी पुरी येथील जगप्रसिद्ध अशा जगन्नाथ मंदिराला भेट देऊन भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले. तर त्यासोबतच गोवर्धन पिठाचे शंकराचार्यांचीही त्यांनी भेट घेतली आहे.
गुरुवारी दुपारी मोहन भागवत यांनी गोवर्धन पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची भेट घेतली. ही एक औपचारिक स्वरूपाची भेट होती. यावेळी मोहन भागवत आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्यात चर्चा झाली असून सरसंघचालकांनी शंकराचार्यांचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व संवाद केंद्रातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
लीड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत
प्रतीक कर्पेंचा सरदेसाईंवर पलटवार
संशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा
शंकराचार्यांच्या भेटीनंतर सरसंघचालक पुरी येथील पवित्र अशा जगन्नाथ मंदिरात गेले. यावेळी त्यांनी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीकडून असे सांगण्यात आले की जगन्नाथ मंदिर नियमावलीनुसार सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला.