सरसंघचालकांचे नमामी गंगे

सरसंघचालकांचे नमामी गंगे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या दोन दिवसांच्या हरिद्वार दौऱ्यावर आहेत. रविवार आणि सोमवार असा दोन दिवसांचा हा दौरा आहे. हरिद्वार येथे सध्या कुंभमेळा सुरु आहे. त्याच्याच निमित्ताने सरसंघचालकांचा हा हरिद्वार दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी विविध गंगा घाटांचे उद्घाटन केले.तर त्यासोबतच त्यांनी गंगास्नानही केले.

रविवार ४ एप्रिल रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसीय हरिद्वार दौऱ्याची सुरुवात झाली. सरसंघचालक कुंभनगरीत दाखल झाल्यामुळे तिथे एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला. या दौऱ्यात सरसंघचालकांनी रविवारी काही गंगा घाटांचे लोकार्पण केले. हे गंगा घाट काही सामाजिक संस्थांकडून उभारण्यात आले आहेत.यावेळी बोलताना गंगा माता ही आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.

हे ही वाचा:

कोळसा घोटाळ्याच्या खटल्यांसाठी दोन न्यायाधीशांची नियुक्ती

कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

सत्ताधाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकुचित

सरसंघचालकांनी अमरापुर घाट, सतनाम साक्षी घाट, भारत माता आणि शौर्य घाट अशा चार घाटांचे लोकार्पण केले. यासोबत त्यांनी दिव्य सेवा मिशन इथे चालणाऱ्या धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला आणि कुंभनगरीत दाखल झालेल्या अनेक साधू संतांशी भेटी गाठी केल्या. तसेच दिव्य प्रेम सेवा मिशन आयोजित एका व्याख्यानमालेतही त्यांनी प्रबोधन केले. यानंतर सोमवारी मोहन भागवत यांनी पवित्र अशा गंगा स्नानाची अनुभूती घेतली.

११ मार्च पासून हरिद्वार येथे शाही कुंभमेळा सुरु झाला आहे. १० एप्रिलपर्यंत हा कुंभमेळा सुरु असणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर हा कुंभमेळा हरिद्वार येथे होत आहे

Exit mobile version