राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांची भेट झाली आहे. हिमाचल प्रदेश येथील धरमशाला भागातील मॅकलॉडगंज येथे हे दोन नेते एकमेकांना भेटले.
धरमशाला येथील दलाई लामा यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. सोमवार २० डिसेंबर रोजी सरसंघचालक मोहन भागवत हे दलाई लामा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. अंदाजे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर या भेटीनंतर तिबेटच्या निर्वासित सरकारचे राष्ट्रपती पेन्पा त्सेरिंग यांनीदेखील सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी तिबेटच्या निर्वासित सरकारचे अध्यक्ष सोनम तेंफेल हे देखील उपस्थित होते.
हे ही वाचा:
मतदार ओळखपत्राला नवा ‘आधार’! लोकसभेत विधेयक मंजूर
जानेवारीत होणार आयपीएल मेगा लिलाव?
‘सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत’
तीन तास झाले; ऐश्वर्या रायची चौकशी सुरूच!
त्सेरिंग यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीची माहिती दिली. “या महिन्याच्या १५ तारखेपासून पूजनीय दलाई लामा यांनी जनतेशी भेटायला सुरुवात केली त्यानंतर पहिल्यांदा ते मला भेटले आणि आज त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. सरसंघचालकांनी या भेटीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना असे सांगितले की धरमशाला मध्ये असताना दलाई लामा यांना भेटण्यासाठी येणे हे अत्यंत नैसर्गिक आहे.” असे त्सेरिंग म्हणाले.
तर दलाई लामा यांच्या बाजूनेही भारतातल्या बहुसंख्य लोकांचे नेतृत्व करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण नेत्याची भेट घेणे नैसर्गिक आहे असे त्सेरिंग यांनी सांगितले.