हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. यात रजनीकांत, आलिया भट्ट, रणबिर कपूर, रणदीप हुडा आणि धानुषसहित अन्य कलाकारांचाही समावेश आहे. आता ‘आरआरआर’फेम अभिनेता रामचरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला यांनाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
रामाचा वनवास म्हणजे सामाजिक एकात्मतेचे एक अद्वितीय उदाहरण
प. बंगालच्या पुरुलियामधील साधूंवरील हल्ला पालघरच्या हत्याकांडासारखा
अरविंद केजरीवालांना ईडीचं चौथं समन्स
संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी हैदराबादस्थित त्यांच्या घरी जाऊन त्यांना विशेष निमंत्रण दिले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात चित्रपट कलाकारांसह राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडाजगतातील नामांकित सहभागी होण्याची आशा आहे. रामचरण यांनी एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात ज्युनिअर एनटीआरही होते. रामचरण हे आगामी ‘गेमचेंजर’ चित्रपटात दिसणार आहेत. त्यात त्यांच्यासोबत कियारा अडवाणीदेखील आहे.
अयोध्येत १४ ते २२ जानेवारीपर्यंत अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. २२ जानेवारी रोजी राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अयोध्येत सुमारे एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राम मंदिराच्या प्रत्येक मजल्याची उंची २२ फूट आहे. त्यात सुमारे ३९२ खांब आणि ४४ प्रवेशद्वारे आहेत.