रोहित शर्मा पोहचला तिरुपती बालाजीच्या दर्शनाला

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला

रोहित शर्मा पोहचला तिरुपती बालाजीच्या दर्शनाला

आशिया चषक २०२३ या स्पर्धेकडे आता लक्ष असतानाचा सध्या भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुद्ध खेळत आहे. दरम्यान, या संघात काही मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. लवकरच आता ३० ऑगस्ट पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.

रोहित शर्माचे मंदिरातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रोहितची पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत तो दर्शनासाठी पोहचला होता. क्रिकेटमधील मोठी आणि महत्त्वाची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मंदिरात आशीर्वाद घेण्यास पोहचले असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज टी- २० मालिकेत भारतीय संघाचा भाग नाहीत. दोन्ही खेळाडूंना आशिया कप स्पर्धेपर्यंत विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, रोहित शर्मा आंध्र प्रदेशातील तिरुपती शहरात पोहोचला. तिथे त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात भगवानांचे आशीर्वाद घेतले. रोहितचा त्याच्या कुटुंबासह दर्शन घेण्यासाठी गेल्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी आणि मुलगीसह तो मंदिराकडे जात आहे. त्याच दरम्यान त्याच्या चाहत्यांनी त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

५० टक्के कमिशनचा आरोप करणाऱ्या प्रियांका वड्रा, कमलनाथ यांच्याविरोधात तक्रार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीपीवर तिरंगा

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर चौथ्यांदा कोरले नाव

आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी

त्यांचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी रोहित शर्मा हा विराट कोहली याचे अनुसरण करत असल्याचे म्हणत आहेत तर काहींनी रोहित शर्माचे कौतुक केले आहे.

Exit mobile version