ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या वैशिष्ट्यांची चर्चा होऊ लागली आहे. हिंदू वंशाचा पहिला पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांची ओळख बनली आहे. विशेष म्हणजे ऐन दिवाळीतच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे इंग्लंडमध्येच नव्हे तर भारतातही एक उत्सव साजरा केला जात आहे.
ऋषी सुनक यांच्याबाबतीत या काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
- ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून हिंदू वंशाचा आणि भारतीय वारसा असलेली तसेच हिंदू परंपरा मानणारी पहिली व्यक्ती म्हणून ऋषी सुनक यांच्याकडे पाहिले जात आहे.
- सुनक यांचे आजोबा हे पंजाबचे होते आमि पूर्व आफ्रिकेतून ते ब्रिटनमध्ये १९६०च्या सुमारास स्थलांतरित झाले.
- २०१५मध्ये आपल्या पहिल्या भाषणात सुनक यांनी म्हटले होते की, आपले आजोबा हे ब्रिटनमध्ये आले तेव्हा त्यांच्यापाशी काहीही नव्हते.
- सुनक यांचे वडील साऊदम्प्टन येथे डॉक्टर म्हणून काम करत होते. तर त्यांची आई मेडिकल दुकान चालवत असे.
- सुनक हे त्यावेळी भारतीय रेस्टॉरन्टमध्ये वेटर म्हणून काम करत आणि नंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात आणि त्यानंतर स्टॅनफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले.
- इंग्लिश या भाषेसोबत त्यांना हिंदी आणि पंजाबी या भाषाही येतात.
सुनक यांची राजकीय कारकीर्द
- २०१५मध्ये ते रिचमण्डमधून खासदार म्हणून निवडून आले
- २०१८ आणि २०१९च्या दरम्यान स्थानिक प्रशासनाचे संसदीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले
- २०१९मध्ये मुख्य सचिव म्हणून त्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात प्रवेश केला.
- बोरिस जॉन्सन या माजी पंतप्रधानांशी बिनसल्यामुळे त्यांनी जुलै २०२२मध्ये राजीनामा दिला.
- ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांची लिझ ट्रस यांच्याशी स्पर्धा होती पण त्यात ते मागे पडले.
- पण ट्रस यांचा पंतप्रधान म्हणून अल्पकाळ संपल्यानंतर सुनक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतली.
सुनक यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून एमबीए केल्यावर त्यांनी विविध गुंतवणूक कंपन्यांमध्ये काम केले. अक्षता यांच्याशी तिथेच त्यांची भेट झाली आणि मग ते विवाहबद्ध झाले. सुनक हे सर्व हिंदू परंपरा मानणारे आणि त्यांचे पालन करणारे आहेत. साऊदम्प्टन येथे त्यांचा जन्म झाला आणि तेथील मंदिरांमध्ये ते नियमित जातात. त्यांच्या मुली अनुष्का आणि कृष्णा यादेखील भारतीय संस्कृतीतच वाढल्या आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भगवत गीता वाचून शपथ घेतली.
हे ही वाचा:
जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद
विराटच्या ऑस्ट्रेलियातील तुफान फटकेबाजीमुळे भारतात खरेदी थांबली
पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या
या रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार
त्यांनी जाहीर भाषणात हे म्हटले होते की, जरी ते ब्रिटिश नागरीक असले तरी त्यांना हिंदू असल्याचा सार्थ अभिमान आहे. सुनक यांची भेट फॅशन डिझायनर असलेल्या अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. २००९मध्ये ते विवाहबद्ध झाले. अक्षता या इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि भारतातील नामांकित उद्योगपती नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.ब्रिटिश संसदेतील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांची संपत्ती ७३ कोटी पौंड इतकी आहे.