26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरधर्म संस्कृतीनिवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान

Google News Follow

Related

केंद्र सरकारमध्ये गृहसचिवपद भूषवलेले सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मी नारायणन हे त्यांची आयुष्यभराची कमाई श्रीरामाचरणी अर्पण करण्यासाठी जात आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्याच्या मूर्तीसमोरच पाच कोटी रुपये खर्चून १५१ किलो वजनाचा रामचरितमानस हा ग्रंथ येथे स्थापित केला जाणार आहे.

१० हजार ९०२ पदे असणाऱ्या या महाकाव्याचे प्रत्येक पान तांब्याचे असेल. प्रत्येक पानावर २४ कॅरेट सोन्याचा लेप असेल. त्यानंतर त्यावर सुवर्णाक्षरे कोरली जातील. यासाठी १४० किलो तांबे आणि पाच ते सात किलो सोन्याची आवश्यकता भासणार आहे. या ग्रंथासाठी नारायणन यांनी आपली सर्व संपत्ती विकण्याचा आणि बँक खाते रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रामचरितमानस ग्रंथाला रामलल्ला यांच्या चरणापाशी ठेवले जाईल. काही दिवसांपूर्वी पत्नीसोबत अयोध्येला आलेल्या नारायणन यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची यासाठी परवानगी मागितली आहे.
लक्ष्मीनारायणन यांनी रामचरितमानस ग्रंथाची जशी कल्पना केली आहे, तसे रूप वास्तवात आणण्याचा प्रयत्न देशातील सुप्रसिद्ध कंपनी वुम्मिदी बंगारू ज्वेलर्स करेल. या ज्वेलरी कंपनीने नव्या संसद भवनात स्थापित असलेल्या सेंगोलची निर्मिती केली आहे.

कंपनीने सुवर्णजडित रामचरित मानस ग्रंथाचे डिझाईन तयार केले आहे. ते बनण्यासाठी तीन महिने लागतील.
‘ईश्वराने मला आतापर्यंत बरेच काही दिले. मी प्रमुख पदे भूषवली. माझे आयुष्य चांगले चालू आहे. निवृत्तीनंतरही खूप पैसे मिळत आहेत. मी साधे भोजन करणारी व्यक्ती आहे. माझे निवृत्तीवेतनच खर्च होत नाही. ईश्वराने दिलेले खूप काही आहे आणि तेच त्याला परत करत आहे,’ अशी प्रतिक्रिया लक्ष्मीनारायण यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

‘खर्गे यांनी माझ्या मृत वडिलांबद्दल अपशब्द वापरले’

मणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा

चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता

भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे

लक्ष्मीनारायण हे १९७०च्या आयएएस बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे अधिकारी होते. त्यांचा जन्म दिल्लीत झाला. सध्या ते दिल्लीतच राहातात. त्यांची पत्नी सरस्वती या गृहिणी आहेत. तर मुलगी प्रियदर्शनी अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्यांचे वडील सुब्रमण्यम हेदेखील केंद्र सरकारमध्ये सचिव होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा