26 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरधर्म संस्कृतीविशाळगडावरील मलिके रेहान दर्गा हटवा, नाहीतर...

विशाळगडावरील मलिके रेहान दर्गा हटवा, नाहीतर…

ही अतिक्रमणे झाली कशी? ही सगळी अतिक्रमणे त्वरित पाडली जावीत

Google News Follow

Related

‘आई वाघजाई शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे… या घोषणांनी विशाळगड पायथा दणाणून गेला. हिंदुत्ववादी संघटना, हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा म्हणून महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो शिवभक्तांनी हजेरी लावत मुसळधार पावसातही अतिक्रमणमुक्तीचा नारा दिला.

पायथ्याला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांदल घराण्यातील अनिकेत बांदल, संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह. भ. प. शिरीष महाराज मोरे,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभय्या बेग यांनी महाआरती केली. यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले कि, राज्यातील सरकारने एक महिन्याच्या आत विशाळगडावरील १६४ अतिक्रमणे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणे बुलडोझर लावून जशी जमीनदोस्त केली तशा पद्धतीने जमीनदोस्त करावीत अन्यथा विशाळगडावरील मलिक ए रेहान मशिदीची शिवभक्त बाबरीसारखी गत करून विशाळगड मुक्त करतील.

मल्लिकेरेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार होता. त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला ९०% हिंदुच जातात त्या  आणि ज्यांच्या घरात मालिकेरेहान दर्गाचा फोटो लावला आहे तो काढून टाकण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांनी प्रतापगडाप्रमाणे विशाळगड ही अतिक्रमणमुक्त करण्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे असेही सांगितले.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे त्यांचे स्फूर्ती देणारे स्मारक उभे करावे.

यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह. भ. प. शिरीष महाराज मोरे म्हणाले कि, किल्ल्यावर १५६ अतिक्रमणे आहेत. यात तीन मजली मशीद, दर्ग्याचे अतिक्रमणसुद्धा आहे. रायगडावरचे, राजगडावरचे एक दगड जरी हलवायचे म्हटले, तरी हजार परवानग्या घ्यायला लागतात. मग, ही अतिक्रमणे झाली कशी? ही सगळी अतिक्रमणे त्वरित पाडली जावीत, अशी सरकारकडे मागणी आहे. यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हिंदू एकता आंदोलनाचे २०० ते २५० कार्यकर्ते सहभागी झाले.

हे ही वाचा:

‘आम आदमी’ राजकुमार आनंद बसपातून भाजपात !

ऑस्ट्रियात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी वाजले ‘वंदे मातरम’

राहुल द्रविड म्हणाला, मला ५ कोटी नको, अडीच कोटीच द्या!

जॅकलिनमागे ईडी पिडा सुरूच, पुन्हा नोटीस

हिंदू एकताचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, अवधूत जाधव खणभाग अध्यक्ष, अनिरुद्ध कुंभार सांगलीवाडी, सुजित पाटील, श्रीधर मिस्त्री, संजय निकम, सचिन देसाई, मनोज साळुंखे, प्रकाश निकम, प्रदीप निकम, अध्यक्ष,जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, कोल्हापूर शहर अध्यक्ष गजानन तोडकर, कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बराले, गणेश नारायण, बापू वडगावकर, संजय साडविलकर तसेच हिंदू एकता आंदोलनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा