दसरा म्हणजे रावणदहन ही आता परंपरा झाली आहे. प्रभू श्रीरामाने याच दिवशी रावणाचा वध केला. दसऱ्याच्या निमित्ताने रावणाच्या वधाची कथा तर अनेकवेळा ऐकविली जाते पण त्याच रावणाच्या आईची कथा मात्र फारशी ऐकिवात नाही किंवा कुणाला फारशी माहितीही नाही. टाइम्स ऑफ इंडियाने रावणाच्या आईची ही कथा प्रसिद्ध केली होती.
ही कथा अशी-
प्रभू श्रीरामाने रावणाला मारल्यानंतर रावणाचे पार्थिव त्याच्या महालात आणण्यात आले. महालातील सर्व स्त्रिया रडू लागल्या. पण त्याचवेळी रावणाची आई निकाशा हिने महाल सोडून जवळच्या पर्वताता मार्ग अनुसरला होता. त्याचवेळी एका वानराने निकाशा यांचा मार्ग अडवला आणि कुठे चाललात? असा सवाल केला. तुम्ही कोण आहात असे विचारत त्या वानराने निकाशा यांना श्रीरामाकडे नेले. तिथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि रावणाचा भाऊ बिभिषण एकत्र बसले होते. बिभिषणाने विचारले की, आई तू ईथे काय करते आहेस? आणि त्याने हात धरून आपल्या आईला श्रीरामाकडे आणले.
हे ही वाचा:
गुंतवणूकदारांनी लुटले तेजीचे सोने
कोंबडी आणि दारूवाटप करून राष्ट्रीय ‘पार्टी’ची घोषणा
एकनाथ शिंदे यांच्या तिसऱ्या टिझरमध्ये ‘दहातोंडी रावण’
दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी
श्रीरामाने निकाशा यांना न्याहाळले. पांढरे केस, बारीक शरीरयष्टी हे रूप पाहतानाच तिच्या पोटी रावण आणि कुंभकर्ण अशी अतिभव्य मुले जन्माला आल्याचे आश्चर्य श्रीरामाला वाटले. श्रीराम म्हणाले की, माझ्या सैनिकांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. पण तुम्ही घाबरू नका. तुम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहात. एवढेच नव्हे तर महालातील तमाम स्त्रियाही सुरक्षित आहेत. श्रीरामांनी विचारले की, तुम्ही हा महाल सोडून का निघून चालला होतात? त्यावर निकाशा सुरुवातीला काहीही बोलल्या नाहीत. पण त्यानंतर त्या बोलल्या की, अनेक आमिषे समोर असतानाही तुझ्या पत्नीने (सीता) तुझ्याशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. तुम्ही भविष्यात काय कराल हे मला पाहायचे आहे. त्यावर श्रीराम म्हणाले की, आई आपण एकमेकांच्या संपर्कात नक्कीच राहू पण तुम्ही आपल्या महालात जा आणि यापुढे बिभिषणासोबत शांतपणे उर्वरित आयुष्य जगा.
खरे तर, आपल्या पुत्राला मारणाऱ्या श्रीरामाप्रती आदर व्यक्त करताना निकाशा यांना त्रास होत होता पण श्रीरामाप्रमाणे आपण आपल्या मुलाला का वाढवू शकलो नाही याची सलही त्यांना होती.
त्यानंतर निकाशा आपला मुलगा बिभिषण याच्यासह महालात राहू लागल्या. आपल्या सुनांसह त्या राज्यकारभार पाहू लागल्या. राज्यात फिरून हवे नको ते पाहू लागल्या. त्यांनी लोककल्याण केले. रावणाने जे केले होते, त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही वर्षे लोटली.
प्रभू श्रीरामांनी शरयू नदीत जलसमाधी घेतल्याचे वृत्त त्यांच्या कानी आले. त्यांना अश्रु आवरले नाहीत. त्या दुःखावेगाने म्हणाल्या की, प्रभू तुम्ही मला अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवलात. मला आता जगण्यासारखे असे काही शिल्लक राहिलेले नाही. तुमच्या जाण्याच्या दुःखातून मला कोण सावरेल?
निकाशा यांनी उर्वरित आयुष्य श्रीराम नामाचा जप करण्यात घालविली. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी श्रीराम श्रीराम असा जप केला.