सूर्यस्तुती करत आजपासून करूया सूर्यदेवाची पूजा

सर्वांना रथसप्तमीच्या आरोग्यमय शुभेच्छा

सूर्यस्तुती करत आजपासून करूया सूर्यदेवाची पूजा

पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव , प्रभातीस येशी सारा , जागवीत गाव

आज माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी यालाच आरोग्य सप्तमी , पुत्र सप्तमी असं सुद्धा म्हणतात. महर्षी कश्यप आणि अदिती देवी यांच्या पोटी आज सूर्य देवांनी जन्म घेतला. आजच्याच दिवशी सूर्य आपल्या रथात बसून प्रवासा स सुरवात करतो. आपल्या सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन आपल्या अरुण या सारथ्याबरोबर सूर्यदेव उत्तर गोलार्धाच्या दिशेने आपली वाटचाल करतात. म्हणूनच याला रथसप्तमी म्हणतात. आजच्याच दिवशी मुद्दाम दूध उतू जाऊ देतात आणि उरलेल्या दुधाचा प्रसाद म्हणून सगळे पितात.  सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याचे स्थान सर्वात वरचे आहे. रथसप्तमीशी अनेक पुराणात अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

 

माघ महिन्यात वसंत पंचमी, माघी गणेश जयंती , भीमाष्टमी आणि रथसप्तमी असे सण आपण साजरे करतो.आजच्या रथसप्तमीच्या पूजेने आपल्याला आरोग्य, भरपूर तेज आणि बलवान होण्याचे फायदे मिळतात.सूर्यनारायणामुळे पृथ्वीवरील अंधकार नाहीसा होऊन रोज सकाळी पूर्ण चराचरांत नवे तेज नवा प्रकाश येतो यामुळे संपूर्ण सृष्टी त नवचैतन्य निर्माण होते.आपल्याकडे संक्रांतीचा सण हा रथसप्तमीपर्यंत साजरा करतात. रथसप्तमीपासून वातावरणातील उष्णता वाढून दिवस तिळातिळाने मोठा होतो आणि रात्र लहान होत जाते. आंब्याला मोहोर येण्याची सुरवात होते आणि वसंत ऋतू ची चाहूल लागते.

सूर्य हा सर्व प्राणिमात्रांचा अन्नदाता आहे त्याच्यामुळेच सर्व सृष्टीत अन्नधान्य पिकते, चांगले आरोग्य लाभते म्हणून त्या सूर्यदेवाचे आभार व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी आपण साजरी करतो. श्रीविष्णूंचे एक रूप म्हणूनही आपण सूर्याचे पूजन करतो.सूर्यदेवांच्या रथाला जे सात अश्व आहेत त्यांना प्रत्येकाला एक नाव आहे, ती म्हणजे गायत्री, वृहती, उष्णईक, जगती,त्रिष्टुप ,  अनुष्टुप, पंक्ती अशी त्याची सात नावे आहेत.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

मकर संक्रांती ते रथ सप्तमी या कालावधीत केले जाणारे कौटुंबिक विधी
‘सुनेचे तिळवण म्हणजे हळदि कुंकू, तीळ आणि साखरेचे सुनेला दागिने घालतात.
पाच वर्षापर्यंतच्या मुलांना बोरन्हाण केले जाते,यात मुलांना तीळ आणि साखरेचे दागिने घालतात आणि चॉकलेट, तिळगुळ बोरे , ऊस यांनी मुलांच्या डोक्यावरून ओतल्यासारखे करतात. आजूबाजूला इतर मुले हि बाजूने घेर करतात. , इतर मुलांना बोलावले जाते आणि नवीन सुनेलाही हलव्याचे दागिने घातले जातात.

गेल्या अनेक दिवसांच्या छान गुलाबी थंडीमुळे जरी आपल्याला सध्या अंथरुणातून उठावेसे वाटत नसले तरी आज लवकर उठून तुम्ही सूर्य नारायणाला वंदन करून पूर्ण वर्षभरासाठी छान ऊर्जा मिळवा. सूर्यदेवाच्या कृपेने आपण सर्वांच्या सर्व शारीरिक पीडा दूर होऊन सर्वांना चांगले आयुष्य लाभू देत.

 

Exit mobile version