बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दसरा रंगावली स्पर्धेत पुरुष गटात चारुदत्त वैद्य, प्रशांत मयेकर, संतोष अनुभवणे यांनी पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळविले तर महिलांमध्ये नीता कदम, स्नेहा कदम, अश्विनी म्हात्रे यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले.
ललितकला व प्रदर्शन विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. दादर आणि कुलाबा येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. बेस्टच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा असते. या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या रांगोळीतून या कर्मचाऱ्यांमधील कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले. विविध विषयांवर कलाकारांनी रांगोळ्या काढल्या. त्यात महिलांवरील अत्याचार, पंडित जसराज, रतन टाटा, सरोज खान, सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, देवीची रूपे, कोरोना असे विविध विषय या स्पर्धेत हाताळण्यात आले होते, अशी माहिती भारती कांबळी यांनी दिली.
हे ही वाचा:
आर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच
पालघरमध्ये ‘रावण पूजे’चा घाट; आदिवासींकडून आयोजनाला तीव्र विरोध
लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?
या स्पर्धेतील विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्यांची यादी अशी-
पुरुष गट
- चारुदत्त वैद्य, २) प्रशांत मयेकर, ३) संतोष अनुभवणे, उत्तेजनार्थ : १) महेंद्र शेंद्रे, २) विशाल चव्हाण, ३) यतिन पिंपळे, प्रशस्तीपत्रक : सुनील गोरिवले, दत्ताराम दळवी, वसंत राणे.
महिला गट
- नीता कदम, २) स्नेहा कदम, ३) अश्विनी म्हात्रे, उत्तेजनार्थ : १) संगीता पुरव, २) रेखा मोहिते, ३) शिल्पा साळवे, प्रशस्तीपत्रक : गौरी आरोलकर, अश्विनी मोहिते, योगिता दुबे.