हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडला सध्या स्वातंत्र्यसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची भुरळ पडली आहे. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर घेऊन येत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण दिसणार यावरून चर्चा पाहायला मिळाली होती. त्याला आता पूर्णविराम लागणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्याचे नाव निश्चित झाले आहे.
अभिनेता रणदीप हुडा हा या चित्रपटात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसेल. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये रणदीप हुडा हा एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखला जातो.कायमच वेगवेगळ्या पठडीच्या भूमिका करण्याकडे त्याचा कल असतो. त्यात आता आणखी एका भूमिकेची भर पडणार आहे.
हे ही वाचा:
हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले
‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’
‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’
…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी इन्स्टाग्राम पोस्टवरून या संदर्भातील घोषणा केली आहे. “लेखणी आणि पुस्तकांनी ज्यांनी इतिहासाला एक वेगळे वळण दिले ते लवकरच तुमच्या भेटीला येत आहेत” असे म्हणत रणदीप हुडा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
तर या भूमिकेबद्दल बोलताना रणदीप हुडा यांनी असे म्हटले आहे की, “काही कथा सांगितल्या जातात पण काही कथा या जगल्या जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटाचा भाग असण्याबद्दल मी उत्साही आहे तसेच ही एक अभिमानाची बाब आहे”