हिंदूद्वेष्टी राणा अयुब म्हणते, कर्नाटकातील भगवा ध्वज फडकाविणारी मुले हिंदू दहशतवादी

हिंदूद्वेष्टी राणा अयुब म्हणते, कर्नाटकातील भगवा ध्वज फडकाविणारी मुले हिंदू दहशतवादी

ईडीने छापा मारून तब्बल १.७७ कोटी रुपये ज्या तथाकथित पुरोगामी राणा अयुबकडून जप्त केले, तिचा आणखी एक द्वेषमूलक चेहरा समोर आला आहे. राणा अयुबने कर्नाटकातील कॉलेजात भगवा ध्वज फडकाविणाऱ्या मुलांना हिंदू दहशतवादी म्हटले आहे. त्याविरोधात आता पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बीबीसीवर यालदा हकीम या पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीत राणा अयुबने हे विद्वेषपूर्ण विधान केले आहे.

आपल्या या मुलाखतीत राणा अयुब म्हणते की, का अचानक ही हिंदू मुले किंबहुना हिंदू दहशतवादी कर्नाटकातील एका शैक्षणिक संस्थेत भगवा ध्वज फडकावित होते. त्याचा अर्थ काय?

राणा अयुबचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आशुतोष दुबे या मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाने राणा अयुबविरोधात बुधवारी दुपारी एफआयआर दाखल केला. बांद्रा पोलिस ठाण्यात या वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, भगवे ध्वज हाती घेतलेल्या मुलांच्या बाबतीत राणा अयुबने अपमानजनक वक्तव्ये केली आहेत. तिच्या या द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे तिच्यावर भारतीय दंडविधानानुसार कलमे घातली गेली पाहिजेत.

हे ही वाचा:

भाराने कोसळणार पानसरे इमारत?

‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक; सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाईल’

इक्बाल कासकरला ईडीकडून होणार अटक

मुस्लिम आणि मुस्लिमेतरांमध्ये अंतर निर्माण करणारा हिजाब!

वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिखाण करणाऱ्या राणा अयुबची १.७७ कोटींची संपत्ती ईडीने ताब्यात घेतली. कोविड १९च्या नावाखाली तिने ही संपत्ती गोळा केली होती. त्याचा ती वापरही करत होती. ही कारवाई होत असतानाही तिचा हिंदूंबद्दलचा द्वेष कमी झालेला नाही.

राणा अयुबप्रमाणेच लेखक आणि कवि जावेद अख्तर यांनीही ट्विट करत या मुलांनी कसा मुस्कान खान या मुलीवर हल्ला केला असे म्हटले होते. प्रत्यक्षात ती मुलगी त्या कॉलेजमध्ये आली तेव्हा तिच्या प्रत्येक हालचालीना टिपणारे कॅमेरे तिच्या सोबत होते. त्या कॅमेऱ्याकडे पाहात तिने अल्ला हू अकबर अशा घोषणा दिल्या होत्या. तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या भगवी उपरणी घातलेल्या मुलांना उसकाविण्याचे काम तिने केले. त्याबद्दल तिला ५ लाखांचे इनामही जाहीर झाले.

Exit mobile version