देशभरात दिवाळी सणाची लागभाग सुरू झाली असून ११ नोव्हेंबर रोजी “राम नगरी” अयोध्या २४ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. दिवाळीनिमित्त हे संपूर्ण शहर सजले आहे. यावेळी लेझर शोचीही तयारी करण्यात आली असून, त्याद्वारे प्रभू रामाच्या जीवनाची झलक दाखवण्यात येणार आहे. अनेक राज्यांच्या रामलीलाही येथे रंगणार आहेत. शरयू नदीच्या काठावरील ५१ घाट दिव्यांनी सजवण्यात आले आहेत.
तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरितमानसचे सात अध्याय तक्त्यांमधून मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय देश-विदेशातील रामलीलाही येथे रंगणार आहेत. त्याचबरोबर ५१ घाट दिव्यांनी सजवण्यासाठी २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक या कामात गुंतले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. दिवाळीनिमित्त या दिव्यांमध्ये मोहरीचे तेल ओतून प्रज्वलित करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी देखील उत्तर प्रदेश सरकारने असाच एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी २१ लाख दिव्यांची सजावट करून प्रज्वलित करण्यात आले हा एक जागतिक विक्रम होता. यावेळीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार तयारी करण्यात आली आहे. हे २४ लाख दिवे प्रज्वलित होणार आहेत. त्याचबरोबर दीपोत्सवानिमित्त शरयू नदीच्या काठावर आयोजित केलेला लेझर शो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. नदीला लागून असलेल्या पुलावरही दिव्यांच्या माळा लावून सुंदर सजावट करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
ससूनमधील पंचतारांकित सुविधांसाठी ललित पाटील मोजत होता १७ लाख रुपये
अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!
बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!
मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या
भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील हा सातवा दीपोत्सव आहे. यावेळी अनेक राज्यांच्या संस्कृतीचे दर्शनही अयोध्येत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी इतर राज्यातील कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत. यावेळी रशिया, नेपाळ, श्रीलंका आणि सिंगापूर येथील रामलीला रंगणार आहेत. त्याचबरोबर २१ राज्यातील कलाकारही सादरीकरण करणार आहेत.