सोन्या- चांदीने, अनमोल रत्नांनी सजल्या रामलल्लाच्या पादुका!

पादुका १९ जानेवारी रोजी अयोध्येत दाखल होणार

सोन्या- चांदीने, अनमोल रत्नांनी सजल्या रामलल्लाच्या पादुका!

अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराच्या तयारीला वेग आला असून येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच श्री रामाच्या पादुका तयार झाल्या आहेत. या पादुका सध्या एस जी हायवेवरील तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. अयोध्येत येत्या २२ जानेवारीला प्रभू श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी १९ जानेवारी रोजी या पादुका अयोध्येत दाखल होणार आहेत.

हैदराबादमधील श्री चल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका तयार केल्या आहेत. १ किलो सोनं आणि ७ किलो चांदीचा वापर करत पादुका तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय या पादुका तयार करताना बहुमुल्य अशा रत्नांचा त्यात वापर करण्यात आला आहे. रविवारी पादुका रामेश्वरधामहून अहमदाबादला आणण्यात आल्या होत्या. या पादुका हातात घेऊन श्री चल्ला श्रीनिवास अयोध्या निर्माणधीन मंदिराची ४१ दिवसाची परिक्रमा देखील पूर्ण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य हस्ते अयोध्येला प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी २ हजार ५०० पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय ४ हजार साधु संतांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तर, २३ जानेवारीपासून मंदिर भक्तांसाठी खुले राहणार आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास ७ हजार मान्यवरांना राम मंदिरात राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं आहे. याशिवाय, दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कथुआतील निरपराध हिंदूंवरील अत्याचाराचा पुस्तकातून पर्दाफाश

स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक

लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील पाणघोड्याचा क्लिनरवर हल्ला, क्लिनरचा जागीच मृत्यू!

‘चीनला शिकवलेला धडा जिनपिंग कधीही विसरणार नाहीत’

या कार्यक्रमासाठी १९९२ मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी तीन दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही. २३ जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना भव्य राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.

Exit mobile version