भारतीय जनमानसात प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे, रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका. मागच्या टाळेबंदीत ही मालिका दूरदर्शनने लोकांच्या मनोरंजनासाठी पुनःप्रक्षेपित केली होती. सध्या महाराष्ट्रात टाळेबंद सदृश परिस्थिती आहे आणि ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मागच्या वर्षी २०२० मध्ये कोरोनामुळे टाळेबंदी लागू केलेली असताना, सुमारे ३३ वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका त्याही वेळेला अत्यंत लोकप्रिय ठरली होती. यावेळी स्टार भारत या वाहिनीवरून या मालिकेचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे.
हे ही वाचा:
धन्यवाद मोदीजी! हाफकिनला कोवॅक्सीन बनवण्याची परवानगी
राज्य सरकारचा प्रताप! मुंबईत तीन लाख किलो डाळ सडून वाया
महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवायला धावून आले मुकेश अंबानी
ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना
या मालिकेत सीतेच्य भूमिकेत असलेल्या दिपीका चिखलिया टोपीवाला यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून या मालिकेच्या चाहत्यांना या बाबत माहिती दिली होती.
“तुम्हा सर्व प्रेक्षकांना सांगायला मला फार आनंद होत आहे की, ‘रामायण’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागच्या वर्षी टाळेबंदीत ‘रामायण’ दाखवले गेले होते, इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे असं दिसतंय.”
रामानंद सागर लिखित आणि निर्मित ‘रामायण’ ही मालिका दूरदर्शनवर १९८७ मध्ये पहिल्यांदा प्रक्षेपित झाली होती, आणि अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाली होती. कित्येक वर्षांत या मालिकेचा स्वतंत्र चाहता वर्ग देखील तयार झाला.
या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची भूमिका निभावली होती, तर सुनिल लाहिरी यांनी लक्ष्मणाची. ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांनी या मालिकेत मंथरेचे काम केले होते आणि अरविंद त्रिवेदी हे रावणाच्या भूमिकेत दिसले होते. या मालिकेत दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका वठवली होती.