अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.सोहळ्याच्या धार्मिक विधींना आज मंगळवारपासून सुरुवात झाली असून २१ जानेवारीपर्यंत ह्या विधी चालू असणार आहेत.१८ तारखेला प्रभू श्री रामाची मूर्ती गाभाऱ्यात स्थापित केली जाणार आहे.तसेच गेल्या ७० वर्षांपासून पूजली जात असलेली प्रभू रामाची मूर्ती देखील मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण माहिती राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी दिली.
चंपत राय म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी सुरू होईल. ही पूजा सुमारे ४० मिनिटे चालणार असल्याचे चंपत राय यांनी सांगितले.हा संपूर्ण कार्यक्रम ६५ ते ७५ मिनिटांचा असेल, आधी माहिती चंपत राय यांनी दिली.या भव्यदिव्य सोहळ्याचा मुहूर्त वाराणसीमधील ज्ञानेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढला आहे.
धार्मिक विधी वाराणसीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली १२१ वैदिक आचार्य पार पाडणार आहेत.प्राणप्रतिष्ठा विधीप्रसंगी गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल,श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास उपस्थित राहणार आहेत.या महोत्सवात १५० हुन अधिक संत-महंत आणि ५० हुन अधिक आदिवासी, डोंगर रहिवासी, किनारपट्टीचे रहिवासी, बेटवासी उपस्थित राहणार आहेत.तसेच मंदिराच्या बांधकामाशी संबंधित ५०० हून अधिक लोक (इंजिनियर ग्रुप) देखील सहभागी होणार आहेत.
हे ही वाचा:
दररोज १८ तास काम करून घडवली रामाची मूर्ती
लाल समुद्रावरील परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राकडून समितीची स्थापना!
अयोध्येने उघडला ‘गीता प्रेस’साठी नवा अध्याय!
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी सज्ज
राय म्हणाले की, म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. नवीन मूर्ती शालिग्राम दगडापासून बनवण्यात आली असून तिचे वजन १५० ते २०० किलो आहे.ही मूर्ती १८ जानेवारीला गाभाऱ्यात ठेवण्यात येणार आहे.तसेच २०-२१ जानेवारीला भाविकांना प्रभू रामाचे दर्शन घेता येणार नसून २३ तारखेपासून मूर्तीचे दर्शन सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती चंपत राय यांनी दिली.
समारंभ सोहळा
१६ जानेवारी : प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन
१७ जानेवारी : मुर्तीचा परीसर प्रवेश
१८ जानेवारी (संध्याकाळी) : तीर्थपूजन, जलयात्रा आणि गांधधिवास
१९ जानेवारी (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
१९ जानेवारी (संध्याकाळी) : धनाधिवास
२० जानेवारी (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास
२० जानेवारी (संध्याकाळी) : पुष्पाधिवास
२१ जानेवारी (सकाळी) : मध्याधिवास
२२ जानेवारी (संध्याकाळी) : शैयाधिवास