मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!

अयोध्येसह संपूर्ण देशात रामराज स्थापन होणार, मुख्यमंत्री योगी

मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!

५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू राम आज( २२ जानेवारी) अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. रामललाच्या अभिषेक प्रसंगी देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुणेही अयोध्येत उपस्थित आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. अयोध्येतील राम मंदिरातून जनतेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज रामाचे नाव प्रत्येकाच्या मनात आहे, संपूर्ण देश राममय झाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पडला.पंतप्रधान मोदींसोबत मंदिराच्या गर्भगृहात मोहन भागवत,राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह आदी उपस्थित होते.अनेक धार्मिक विधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला संबोधित केले. योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्री रामजन्मभूमी कदाचित जगातील पहिला देश असेल जिथे बहुसंख्य समुदायाने त्यांच्या देवाच्या मंदिराच्या उभारणीसाठी इतका संघर्ष केला असेल. आज सर्व संतांच्या आणि लोकांच्या संघर्षानंतर तो शुभ मुहूर्त आला आहे जेव्हा आपण ज्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता त्याच ठिकाणी मंदिर बांधले गेले आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंदिराच्या उभारणीत हातभार लावणाऱ्या सर्व लोकांचा आभारी आहे, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत

मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह हिंदूंच्या ताब्यात द्यावी!

राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!

त्रेतायुगाचे वैभव अयोध्येत अवतरले
ते पुढे म्हणाले की, आज आम्ही गर्भगृहात रामललाचे अलौकिक रूप पाहिले. ज्या कारागिरांनी आपल्या मनात वास करणारे रामाचे रूप निर्माण केले ते धन्य आहेत, त्यांचेही आपण आभारी आहोत. ते सर्व लोक महान आहेत, ज्यांनी श्री रामजन्मभूमीवर राम मंदिर बांधण्यात योगदान दिले. आज त्रेतायुगाचे वैभव अयोध्येत अवतरले आहे. आज प्रत्येकाला अयोध्येत यायचे आहे. अयोध्येत विमानतळ बनले, येथे चार लेनचा रस्ता बनवणे, शरयू येथे क्रूझ चालवणे, या सर्व गोष्टी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीशिवाय आणि नेतृत्वाशिवाय शक्य झाले नसते, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.

अयोध्येसह संपूर्ण देशात रामराज स्थापन होणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आज यूपीमधील डबल इंजिन सरकार अयोध्येत अनेक विकास कामे पूर्ण करत आहे. या मोक्षदायिनी शहराचा सोलर सिटी म्हणूनही विकास केला जात आहे. हा केवळ शहराचा किंवा यात्रेचा विजय नाही, तर हे सत्यमेव जयतेचे चित्र आहे, हा जनतेच्या श्रद्धेचा विजय आहे. आता अयोध्येत परिक्रमेदरम्यान गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, आता तुम्हाला इथे येण्यापासून कोणीही रोखणार नाही. आता अयोध्येसह संपूर्ण देशात रामराज स्थापन होणार आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पाठिंबा देणारे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, कारागीर यांच्यासह सर्व लोकांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो.

Exit mobile version