राम सिया राम.. अयोध्येला जाणाऱ्या विमानातील लोक राम भजनात नाचून दंग!

दिल्लीहून अयोध्येला जाणाऱ्या विमानामध्ये राममय वातावरण

राम सिया राम.. अयोध्येला जाणाऱ्या विमानातील लोक राम भजनात नाचून दंग!

अयोध्येत पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान देशभरातील प्रभू राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अयोध्येत सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.दरम्यान, दिल्लीहून अयोध्येला जाणाऱ्या विमानामध्ये प्रवासी श्री रामाचे भजन करताना दिसले.विमानात राम भजनावर नाचतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमानामध्ये बसलेले प्रवासी राम सिया राम भजनात दंग होऊन नाचत आहेत.

व्हिडिओमध्ये भगवे कपडे घातलेला एक व्यक्ती विमानात पूर्ण भक्तिभावाने राम भजन गात असल्याचे दिसत आहे.त्याच्यासोबत विमानात बसलेले प्रवासी टाळ्या वाजवत प्रभू राम भजनाच्या तालावर नाचत आहेत.यावेळी विमानात बसलेले काही प्रवासी व्हिडिओ बनवतानाही दिसले.

हे ही वाचा:

अंतराळातून राम मंदिर कसं दिसतं?, इस्रोने पाठवला फोटो!

दिल्ली एम्सचा यु-टर्न, २२ जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंदचा निर्णय मागे!

ओवेसी लवकरच रामभक्त होतील अन ‘राम-नामाचा’ जप करतील!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्या कारसेवेला हजर असल्याचा सादर केला पुरावा!

दरम्यान, रामलल्लाच्या अभिषेकाची देशभरात जय्यत तयारी सुरु आहे.संपूर्ण देश राममय झाला आहे.प्रभू राम मंदिरात विविध विधी पार पडत आहेत.पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा अभिषेक सोहळा पार पडणार आहे.उद्या दुपारी १२.३० वाजता अभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी उपस्तिथ संत आणि प्रतिष्ठित ७,००० हुन अधिक लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील.या सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी हे मंदिर लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे.देशभरातील लाखो भाविक हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Exit mobile version